क्रांतीचौकात जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात केली तीव्र निदर्शने...

जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात केली तीव्र निदर्शने.. !
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.10(डि-24 न्यूज)- सर्व विरोधी पक्षांचा अंतर्भाव असलेल्या जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीतर्फे आयोजित राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून क्रांती चौक येथे आज जोरदार निदर्शने करून विरोधी पक्षांनी एकजूट दाखवली.
याबाबत असे की,
महाराष्ट्र सरकारने सादर केलेले जनसुरक्षा विधेयक 2024 हे लोकशाहीला बाधक असून नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे, असा आरोप करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), भाकप, माकप, स्वराज अभियान, शेकाप, समाजवादी पक्ष, भारतीय दलित पॅंथर, भाकप माले यांसह विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन या विधेयकाला तीव्र विरोध दर्शविला आहे.
या विधेयकामुळे सरकार व प्रशासनाला नागरिकांना अटक करण्याचे आणि दडपशाही करण्याचे अधिक अधिकार मिळतील. सामाजिक कार्यकर्त्यांच्या आंदोलनांवर व लोकशाही लढ्यांवर दबाव आणण्याचे साधन म्हणून या कायद्याचा वापर होऊ शकतो.
नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने येतील व लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल. हे विधेयक लोकशाही व्यवस्थेच्या मूळ तत्त्वांना धक्का देणारे आहे.
बैठकीत उपस्थित असलेल्या प्रमुख नेत्यांनी स्पष्ट केले की, “हे विधेयक लोकशाहीविरोधी असून सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीचे दर्शन घडवते. सामाजिक चळवळी आणि जनतेच्या आवाजाला गप्प बसवण्यासाठी हा कायदा आणला जात आहे. याला आम्ही कोणत्याही परिस्थितीत मान्यता देणार नाही.”
आंदोलनात विविध पक्षांचे नेते, मान्यवर, तसेच सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्वानी एकमुखाने या विधेयकाविरोधात लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी खा.डॉ. कल्यान काळे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रा. राम बाहेती, कॉ. ऍड. अभय टाकसाळ, भारत जोडो अभियान व जय किसान आंदोलन - स्वराज अभियान चे साथी सुभाष लोमटे, राष्ट्र सेवादलाचे प्रा.सुभाष महेर, रमाकांत पाठक, माकपचे कॉ. भगवान भोजने, लाल निशाण पक्षाचे कॉ. भीमराव बनसोड, समाजवादी पार्टीचे आयुब खान, फैसल खान, श्रमिक मुक्ती दलाचे मेजर सुखदेव बन, दलीत पँथर्स चे रमेश भाई खंडागळे, शिवसेना (उबाठा) चे राजू वैद्य, राजू दानवे, बाळासाहेब थोरात, विकास गायकवाड, राजू हिवराळे, जफर फसलु रेहमान खान, रफिक बक्ष, शेख इसाक, भास्कर लहाने, मधुकर खिल्लारे, गणेश कसबे, इब्राहिम पटेल, त्रिंबक शेजुळ, ॲड. संदीप पाटील, रवींद्र काळे, मोहन देशमुख, डॉ. सरताज पठाण ,भाऊसाहेब जगताप, राजेद्र दानवे, बाळासाहेब थोरात, आतिश पितळे, गौरव जयस्वाल, कांचनकुमार चाटे, शांतीलाल अग्रवाल, भास्कर घायवट, अनिस पटेल, साहेबराव बनकर, उमाकांत खोतकर, संघटन महासचिव इंजि. विशाल बन्सवाल, डॉ. निलेश आंबेवाडीकर, अरुण शिरसाट, महेंद्र रमंडवाल, मोईन इनामदार, शेख कैसर बाबा, सय्यद फैयाजुद्दीन, योगेश थोरात, सलीम खान, अनिल नलावडे, सूर्यकांत गरड, रावसाहेब नाडे, मनोज शेजुळ, विनोद तांबे, निमेश पटेल, संतोष शेजुळ, संतोष मेटे, अनिता भंडारी, उषा खंडागळे, दीपाली मिसाळ, दिक्षा पवार, मोहित जाधव, वरुण पाथ्रीकर, मुदस्सर अन्सारी, ज्ञानेश्वर वाकचौरे, संतोष शेजुळ, सागर दळवी, सुरेश पाटील, प्रकाश सानप, आनंद बनसोड संदीप दारुंटे, लतीफ भाई, रमेश फोलाने, वरून पार्थीकर, दीक्षा पवार, सुरेखा पानखडे, नंदकिशोर बागुल, अरुण बोर्डे, सोमीनाथ पळसकर, नारायण चनघटे, सोमीनाथ पळसकर.
लोकशाहीची गळचेपी करणाऱ्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडीतील घटक पक्ष, डावे पक्ष, जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समिती तसेच राज्यातील विविध पुरोगामी व संविधानवादी संघटना एकत्रितपणे आज क्रांती चौकात एकत्रित झाली आहे. असे चित्र दिसत होते.
What's Your Reaction?






