आमदार प्रशांत बंब यांचे कार्यालयाची तोडफोड, आंदोलक अक्रामक, गंगापूर येथे शांतता
आमदार प्रशांत बंब यांचे कार्यालयाची तोडफोड, आंदोलक अक्रामक... गंगापूर येथे शांतता
गंगापूर, दि.30(डि-24 न्यूज) आमदार प्रशांत बंब यांचे कार्यालय फोडल्यानंतर चौकात अर्धातास आंदोलन करण्यात आले पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. बंब यांच्या कार्यालयावर 30 आक्टोंबर रोजी दुपारी अडीच वाजता हल्लाबोल करुन आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणा बाजी करत अर्धा तास आंदोलन केले असता पोलिसांनी काही आंदोलकांना पोलीसांच्या गाडीत बसवले तेव्हा उपस्थित आंदोलकांनी पोलिसांची गाडी आडवुन ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना खाली उतरून घेतले सर्व आंदोलकांना पायी पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. आमदार प्रशांत बंब यांचे कार्यालय मध्ये असलेले कार्यालयाचे प्रतिनिधी संजय पांडुरंग अभंग हे कार्यालय कामकाज करताना ते किरकोळ जखमी झाले आहे.
गंगापूर येथे मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. गंगापूर खुलताबाद मतदार संघातील भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांचं गंगापूर शहरातील संपर्क कार्यालय मराठा आंदोलकांनी फोडलं आहे. जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न आता चांगलाच पेटलाय. गंगापूर तालुक्यांत अनेक ठिकाणी शांततेत चालू असलेल्या आंदोलनानं गंगापूर शहरांमध्ये आता हिंसक वळण घेतलंय. सरकारच्या भूमिकेमुळे तरुणांच्या आत्महत्या सरकार मराठा आरक्षणासंबंधी कुठलीही ठोस भूमिका घेत नसल्यानं आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत; पण सरकारला त्याचं काही देणं-घेणं नाही असं वाटतंय. त्यामुळं आता येथून पुढं आमदार असो की मुख्यमंत्री प्रत्येकालाच मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे. तसंच आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मराठा समाजाचं आंदोलन अजून तीव्र होईल, असा इशारा मराठा आंदोलकांकडून देण्यात आलाय.
त्यामुळे आंदोलनस्थळी उपस्थित अससेले गावकरी आक्रमक झाले. तिथे एक मराठा-लाख मराठा अशी घोषणाबाजी सुरु झालीय याचाच
परिणाम गंगापूर शहरात सोमवारी दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास दिसुन आला काही मराठा
आंदोलकांनी गंगापूर येथील छत्रपती शिवाजी
महाराज चौकात असलेल्या आमदार प्रशांत बंब
यांच्या कार्यालयात घुसून कार्यालयातील काचा
कपाटाच्या काचा, फर्निचरची तोडफोड केली व बोर्डावर काठ्या मारुन मुख्यमंत्री यांच्या फोटोवर
शाई फेकली व एक मराठा लाख मराठा, आरक्षण
कसं मिळत नाही आम्ही घेतल्याशिवाय राहणार
नाही अशा घोषणा बाजी करून निघून गेले.
What's Your Reaction?