नामांतरावरावर दिवाळीच्या सुट्टीनंतर सुनावणी
नामांतरावरावर दिवाळीच्या सुट्टीनंतर सुनावणी
मुंबई, दि.30(डि-24 न्यूज)
औरंगाबाद शहर व उस्मानाबाद शहर नामांतरावरावर सुनावणी आता दिवाळीच्या सुट्टीनंतर होणार आहे. आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली नाही तर हि सुनावणी आता 6 डिसेंबर रोजी होणार आहे अशी माहिती डि-24 न्यूजला याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांनी दिली आहे.
औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचे धाराशिव करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणात न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज सुनावणी झाली नसल्याने नवीन तारीख मिळाली आहे. आज दोन्ही शहरांचे याचिकाकर्ते व त्यांचे वकील उपस्थित होते परंतु आज सुनावणी होऊ शकली नाही. सर्वांना निर्णयाची अपेक्षा आहे.
What's Your Reaction?