लोटा कारंजा येथील एकाच कुटुंबातील पाच जणांवर काळाचा घाला, स्कोडाच्या अपघात दुर्देवी मृत्यूने हळहळ
स्कोडाला मोठा अपघात, एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू...लोटाकारंजा येथे शोककळा
लोटा कारंजामधील दोघांचा तर आळे फाटा येथील तिघांचा समावेश...
औरंगाबाद, दि.30(डि-24 न्यूज) रस्त्याच्या कडेला टायर पडलेले होते. त्यावरून औरंगाबादच्या दिशेने येणारी स्कोडा कार रस्त्याच्या कडेला पडलेल्या टायरवरून स्लीप होऊन चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट कठडा तोडून ओढयात पडली. या अपघातात औरंगाबाद शहरातील मोमीनपुरा, लोटा कारंजा येथील ज्वेलर्सचे व्यापारी हारुण अमीर मुल्ला यांच्या कुटुंबातील पाच जण ठार झाले. ही दुर्दैवी घटना त्रिमुर्ती शाळेजवळ नेवासा येथे काल रविवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली.
मृतांमध्ये व्यापारी हारुण अमीर मुल्ला यांचा मुलगा वसीम हारुण मुल्ला (वय 20), पत्नी अनसुरा बेगम हारूण मुल्ला (41) राहणार लोटाकारंजा,तसेच रेशमा हलदार (35), हसीना बेगम पठाण (54), सामीया मोमीन हलदार (11) रा. आळे फाटा ता. जुन्नर असे यांचा समावेश आहे. 13 वर्षाची मासुमा हलदार मोमीन ही या अपघातात सहीसलामत बचावली.
सविस्तर माहिती अशी की, हारुण अमीर मुल्ला यांचा मुलगा, पत्नी हे मित्र मोहंमद परवेज रा. औरंगाबाद यांची स्कोडा कार क्रमांक (MH-12-ET-2700) ने शनिवारी 28 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद येथून आळे फाटा येथे गेले होते. 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास आळेफाटा ( ता. जुन्नर जि. पुणे) येथून परत निघाले.
याचवेळी मुलगा वसीम हारूण मुल्ला, पत्नी अनसुरा बेगम हारूण मुल्ला, मेव्हण्याची बायको रेश्मा मोमीन हलदार, हसीना बेगम हारुण पठाण, सामीया मोमीन हलदार, मासुमा मोमीन हलदार हे आळे फाटा येथून औरंगाबाद कडे परत निघाले. परत निघताना मुलगा वसीम याने मुल्ला यांना फोन करुन कळवले.
29 ऑक्टोबर रोजी रात्री 12 च्या सुमारास त्रिमुर्ती शाळेजवळील ओढयावरील पुलावर खडका नेवासा या ठिकाणी येत असताना रस्त्याच्या कडेला टायर पडलेले होते त्यावरुन कार स्लिप होऊन चालक मुलगा वसीम हरून मुल्ला( 20 ) चे नियंत्रण सुटले आणि स्कोडा सरळ कठडा तोडून 20 फूट खोल ओढ्यात पडली. या दुर्दैवी घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. 13 वर्षाची मुलगी मात्र बालंबाल बचावली. हरून मुल्ला हे रात्री झोपेत असताना नातेवाईकांनी रात्री दीडच्या सुमारास त्यांना ही माहिती दिली. त्यांनी लागलीच नेवासा गाठले. मृतांना नेवासा ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवण्यात आले होते. पोलिसांनी हारून मुल्ला यांना सर्व प्रसंगाची माहिती दिली. या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतकांवर आज सायंकाळी बाद नमाज मगरीब शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला.
What's Your Reaction?