जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक नियंत्रित कक्षाची जिल्हाधिका-यांकडून पाहणी
जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक नियंत्रण कक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23 (डि-24 न्यूज) : विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक नियंत्रण कक्षाला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने नियंत्रण कक्षामार्फत करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेतला तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून कामकाजाची माहिती जाणून घेतली.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी निवडणूक निरीक्षक माधवी चावरे खोडे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) सविता चौधर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?