एसडिपिआय एमआयएम सोबत युतीची प्रतिक्षा, 5 जागेचा प्रस्ताव नाही तर मैदानात उतरणार...

 0
एसडिपिआय एमआयएम सोबत युतीची प्रतिक्षा, 5 जागेचा प्रस्ताव नाही तर मैदानात उतरणार...

एसडीपिआयला एमआयएम सोबत युतीची प्रतिक्षा, 5 जागा मागितल्या, नाही तर मैदानात उतरणार...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) - नेहमी अक्रामक आंदोलन करुन प्रशासनाची धावपळ उडवणारा राजकीय पक्ष एसडिपिआय (सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया) महानगरपालिकेच्या निवडणुकीत उडी घेणार आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता यामुळे माघार घ्यावी लागली. एमआयएम पक्षासोबत युती करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलिल यांच्याकडे मागणी केली आहे. युतीबाबत ते सकारात्मक विचार करतील. असा विश्वास आहे, आम्ही त्यांना पाच जागेसाठी प्रस्ताव दिला आहे. काही दिवसांत युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली नाही तर एसडिपिआय स्वबळावर हि निवडणूक लढणार आहे. जेव्हा जेव्हा समाजावर अन्याय झाला पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन आवाज उठवला. गुन्हे दाखल झाले तरीही न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने आंदोलने केली. शहरातील नागरी समस्या असो शहराच्या नामांतर विरोधात आवाज उठवला. शहराच्या विकासासाठी एसडिपिआयला महापालिकेच्या सभागृहात जायचे आहे. विकास काय असतो आमचे नगरसेवक निवडून दिल्यास दाखवून देवू. पहिल्यांदाच पक्षाच्या वतीने हि निवडणूक लढणार आहे. मतदार साथ देतील असा विश्वास आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत एसडिपिआयचे प्रदेश महासचिव सय्यद कलिम यांनी दिली आहे. 

यावेळी जिल्हाध्यक्ष समीर शहा, जिल्हा महासचिव मोहसीन खान, अब्दुल अलीम, पूर्व विधानसभा अध्यक्ष अबुजर पटेल उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow