महाराष्ट्रात एमआयएमची जोरदार इंट्री, नगराध्यक्ष पदाचे खाते उघडले, 10 मुस्लिम नगराध्यक्ष विजयी...
महाराष्ट्रात एमआयएमची जोरदार इंट्री, नगराध्यक्ष पदाचे खाते उघडले... महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी, ओवेसींच्या पक्षाने एक नगराध्यक्ष व 83 नगरसेवक निवडून आणत चांगलीच मजल मारली... विविध पक्षातून 10 मुस्लिम नगराध्यक्ष विजयी झाले...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज)- राज्यातील 288 नगरपरिषद व 42 नगरपंचायतीचे आज निकाल आले. या निवडणुकीत भाजपा एक नंबर पक्ष म्हणून समोर आला, दुसऱ्या नंबरवर शिंदे सेना, तिसऱ्या नंबरवर अजित पवार यांची राष्ट्रवादीला मतदारांनी कौल दिला आहे. तर एमआयएम पक्षाने पहिल्यांदाच नगरपरिषद निवडणुकीत आपले उमेदवार दिले होते. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल यांनी व पदाधिकारी यांनी आपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला होता. या निवडणुकीत एमआयएमने जोरदार इंट्री केली आहे तर विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील श्रीमती फरीदा बानो युसुफ पुंजानी नगराध्यक्ष पदावर निवडून येत खाते उघडले तर तेथे एमआयएमचे 17 नगरसेवक निवडून आले आहेत. राज्यातील 14 नगरपरिषदेत एकुण 83 नगरसेवक निवडून आल्याने राज्यात एमआयएम पक्षाची ताकत वाढत आहे अशी माहिती डि-24 न्यूजला एमआयएमचे नेते नासेर सिद्दीकी यांनी दिली आहे.
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलिल यांनी निकालानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की आम्ही तर नगरपरिषद निवडणूक पहिल्यांदाच लढलो. मतदारांचे आशिर्वाद मिळाले आणि एक नगराध्यक्ष व 83 नगरसेवक निवडून दिले याबद्दल त्यांनी आभार मानले. काही जागांवर नगराध्यक्ष व नगरसेवकाचे उमेदवार 20 ते 50 मतांच्या फरकाने पराभव झाला. स्वबळावर कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम व मतदारांच्या आशिर्वादाने हा विजय मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. याचा परिणाम 29 महापालिका निवडणुकीत दिसून येणार आहे. महापालिका निवडणूकीत जेथे आमची ताकत जास्त आहे तेथून काही पक्ष युती करायचे म्हणत आहे तसे होणार नाही. युती करायची असेल तर महाराष्ट्रात करु चर्चेला या. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत शिंदे सेनाचे नेते म्हणत आहे मुकाबला एमआयएमशी आहे या प्रश्नावर इम्तियाज जलिल यांनी उत्तर देताना सांगितले फक्त शिंदे सेना नाही तर सर्व राजकीय पक्ष बोलत आहे मुकाबला एमआयएम सोबत आहे. हिंदू व दलित बहुल प्रभागातून सुध्दा मजबूत उमेदवार आमच्याकडे आहेत. मतदारांनी आशिर्वाद दिले तर या निवडणुकीत एमआयएम सिंगल लार्जेस पार्टी म्हणून समोर येईल. महापौर बनवण्याचे आमचे लक्ष आहे. कारण विरोधात असणा-या राजकीय पक्षांचे उमेदवार तिकीटाची मागणी करत आहेत परंतु आमच्या पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत कोणाला किती जागा मिळाल्या...
महायुतीचे सर्वाधिक 224 नगराध्यक्ष निवडून आले. महाविकास आघाडीला 50 जागेवर समाधान मानावे लागले. 120 नगराध्यक्ष भाजपाचे निवडून आल्याने सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 58, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 37 जागी नगराध्यक्ष निवडून आल्याने दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसचे 31, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार 10, शिवसेना उध्दव गटाचे 10 नगराध्यक्ष, एमआयएम पक्षाने वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे फरीदा बानो युसुफ पुंजानी या निवडून येत खाते उघडले आहे.
विविध पक्षातून आले 10 मुस्लिम नगराध्यक्ष निवडून...
खुलताबाद - आमेर पटेल
सिल्लोड - अब्दुल समीर अब्दुल सत्तार
कन्नड - शेख फरहीन जावेद शेख
भोकरदन - समरीन मिर्झा
पाथरी - आसेफ खान
माजलगाव - मेहरीन बिलाल चाऊस
बाळापूर, जिल्हा अकोला - डॉ.आफरीन
औसा, जिल्हा उस्मानाबाद - शेख परवीन
कारंजा लाड, जिल्हा वाशीम - फरीदा बानो युसुफ पुंजानी.
What's Your Reaction?