प्रभाग 6 मधून एमआयएम पक्षाकडून बाबा बिल्डर प्रबळ दावेदार, मुलाखत दिल्यानंतर म्हटले दुवा करा...
प्रभाग 6 मधून एमआयएम पक्षाकडून बाबा बिल्डर प्रबळ दावेदार, द मुलाखत दिल्यानंतर म्हटले दुवा करा...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज) - महापालिका निवडणूकीच्या 29 प्रभागातील 115 नगरसेवक उमेदवारांसाठी एमआयएम पक्षाच्या वतीने शुक्रवारपासून इच्छूकांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलिल स्वतः इच्छूकांच्या मुलाखती घेत असल्याने इच्छूकांना प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक द्यावी लागत आहे. प्रभाग 6 मधून विकासाची दृष्टी असलेले रियाज शेख उर्फ बाबा बिल्डर इच्छुक असल्याने हा प्रभाग चर्चेत आहे. या प्रभागातून अनेक कार्यकर्ते निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. या प्रभागातून अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ व समाज कार्यात व पक्षाच्या कामासाठी नेहमी अग्रेसर असलेले बाबा बिल्डर उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. पक्षाने त्यांना उमेदवारी दिली तर ते नक्की विजय होतील व प्रभागाचा कायापालट करतील असे एमआयएमचे कार्यकर्ते व मतदारांचे मत आहे. कोरोना काळातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आज बाबा बिल्डर यांनी मुलाखत दिल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांच्या चाहत्यांना एकच सांगितले उमेदवारी मिळावी यासाठी दुवा करा एवढेच म्हटले...
What's Your Reaction?