रशीद मामू यांच्यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे भडकले, म्हणाले माझा विरोध आहे उमेदवारी मिळू देणार नाही...

 0
रशीद मामू यांच्यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे भडकले, म्हणाले माझा विरोध आहे उमेदवारी मिळू देणार नाही...

रशीद मामू यांच्या प्रवेशानंतर उबाठात ठिणगी...खैरे मामूंवर भडकले म्हणाले उमेदवारीला विरोध...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) - छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुक समोर असताना उबाठात दररोज वाद विवाद पाहायला मिळत आहे. माजी महापौर रशीद खान मामू यांच्या उध्दव सेनेत प्रवेशानंतर राजकारण तापले आहे. आज दुपारी शिवसेना भवनाच्या पाय-याजवळ रशीद मामू यांच्यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे भडकले. मामूंना न भेटता वाद विवाद झाला. भेटण्यास खैरेंनी नकार देत म्हटले "माझा तुला विरोध आहे. त्यामुळे मला भेटायचे नाही" रशीद मामू म्हणाले पक्षात विरोध असेल पण वैयक्तिक तर विरोध नाही ना" असे म्हटले तरी खैरे न भेटता शिवसेना भवनात गेले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. खैरेंनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले दंगल घडवणा-यांना माझा विरोध आहे हे मातोश्रीवर माहीत नाही. त्यांच्या उमेदवारीला माझा विरोध आहे. त्यावर मी ठाम आहे. त्यांच्या प्रवेशामुळे 50 हजार मतांवर परिणाम होईल. अनेक शिवसैनिकांचे मला फोन आले. सोशल मीडियावर सुध्दा विरोध होत आहे. 

माजी महापौर रशीद खान मामू यांनी माध्यमांना सांगितले खैरे नाराज असले तरी त्यांची नाराजी दूर करु. ते माझे चांगले मित्र आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व अंबादास दानवे यांची भेट घेऊन मतभेद दुर करु. असे काही नाही.

अंबादास दानवे यांनी रशीद मामू यांचा मुंबईत पक्ष प्रवेश घडवून आणला. त्यानंतर शिंदे सेना व भाजपाने उबाठा मामू पक्ष अशी टीका केल्याने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे चांगलेच अक्रामक झाले. खैरेंनी रशीद मामू यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध केल्यानंतर शहराचे वातावरण तापले आहे. उबाठावर टिका सुरू झाली आणि आज खैरे आणि रशीद मामू यांच्यामध्ये वाद पाहायला मिळाला. याचे परिणाम महापालिका निवडणुकीत होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow