उबाठाला पुन्हा धक्का, राजु वैद्य यांचा राजीनामा, भाजपात जाणार...?
उबाठाला धक्का, राजु वैद्य यांचा राजीनामा, भाजपात जाणार असल्याची चर्चा...?
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) - महापालिका निवडणूक समोर असताना उबाठाचे महानगर प्रमुख राजु वैद्य यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे सांगत पक्षाला जय महाराष्ट्र केल्याने खळबळ उडाली आहे. ते भाजपात किंवा शिंदे सेनेत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर नेते पक्ष सोडून जात असतील तर कार्यकर्त्यांनी काय करावे हा प्रश्न निर्माण होत आहे. अगोदर 9 माजी नगरसेवक सोडून गेले आणि आज वैद्य यांनी वैयक्तिक कारण देत सोशल मिडिया अकाऊंटवर आपला राजीनामा टाकला. त्यांच्या राजीनाम्यामुळे उबाठाला धक्का बसला आहे. शिवसेना भवनावर इच्छूकांच्या मुलाखती सुरू असताना हि बातमी आल्याने धक्का बसला. यानंतर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले राजु वैद्य हे काही दिवसांपासून शिवसेनेसोबत संपर्कात नव्हते. ते महाविकास आघाडीच्या बैठकीत येणार होते परंतु ती बैठक नगरपरिषदेतील निकालामुळे होऊ शकली नाही. आज सोमवारी त्यांनी आपला राजीनामा सोशल मीडियावर पोस्ट केला तेव्हा समजले. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे उध्दव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने महानगरप्रमुख यांना आपल्याकडे खेचून शिवसेनेला धक्का दिला आहे.
What's Your Reaction?