शिवसैनिकांनो कामाला लागा, चंद्रकांत खैरे यांचे शहरात बैठकांचे सत्र सुरू

 0
शिवसैनिकांनो कामाला लागा, चंद्रकांत खैरे यांचे शहरात बैठकांचे सत्र सुरू

शिवसैनिकांनो कामाला लागा - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

छत्रपती संभाजीनगर, दि.8 (डि-24 न्यूज) शिवसैनिक हा प्रत्येक संकटात सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा राहतो. त्यामुळे आता निवडणुका संपल्या असून, पराभावाची तमा न बाळगता जनसेवेत झोकून द्या. आगामी निवडणूकीसंदर्भात पक्ष योग्य ती भुमिका घेईलच. मात्र, शिवसैनिकांनो कामाला लागून आपले जनसेवेचे कार्य सुरु ठेवण्याचे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. शहराच्या विविध वार्डात आज रविवारी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांच्या वॉर्डनिहाय बैठका झाल्या असून, यावेळी खैरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.

मध्य विधानसभा मतदारसंघातील मयूरनगर वॉर्डाची बैठक भाजी मंडईतील गणपती मंदिर तर पवननगर व शिवनेरी कॉलनी वॉर्डाची बैठक एम-2 महादेव मंदिर आणि श्रीकृष्णनगर वॉर्डाची तेजस मंगल कार्यालयात आणि स्वामी विवेकानंदनगर वॉर्डाची बैठक तेजस मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, सुदाम सोनवणे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, महिला आघाडीच्या सुनिता आऊलवार, सुनिता देव, आशा दातार, नलीनी बाहेती, मीना फसाटे, उपशहरप्रमुख संदेश कवडे, गजानन टेहरे, मनोहर वनकर, राहुल वडनेरे, राजेंद्र व्यास, नितू मानकापे, सोमनाथ घोडतुरे, संदीप कुमावत, राजू सोनवणे, रविंद्र सोनवणे, सागर खरगे, तुषार पठाडे, राहुल सोनवणे, प्रतीक अंकुश, विलास सोनवणे, नीतीन औटी, राजु औटी, गणेश कुलथे, सुनील छत्रे, सदाशिव राऊत, किशोर नागरे, स्वाती नागरे, मनीषा वनगुजरे, किशोर उरगुंडे आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

सोमवारी पूर्व विभागात बैठाका 

सोमवार, 9 रोजी डिसेंबर रोजी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व विभागात बैठका आयोजित केल्या आहेत. 4 वाजता एन -6, सायंकाळी 5 वाजता अविष्कार कॉलनी, 6 वाजता गणेशनगर एन -8 आणि 7 वाजता अयोध्यानगर येथे आढावा बैठक होईल. यावेळी सर्व पदाधिकारी, शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow