मनपाच्या शाळेत लॅन्गवेज लॅब सन्याको साॅफ्टवेअर...!

आयडीबीआय बँकेच्या सीएसआर फंडातून मनपा प्रियदर्शनी विद्यालयास संगणक कक्ष...
लॅन्गवेज लॅब मध्ये सन्याको सॉफ्टवेअर...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज )
आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत व उप आयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक संजीव सोनार यांच्या प्रयत्नातून आयडीबीआय बँकेच्या सीएसआर फंडातून संगणक लॅब साठी फर्निचर उपलब्ध करण्यात आले व अद्ययावत
संगणक कक्ष तयार करण्यात आले.
महानगरपालिकेच्या केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रियदर्शनी येथे समग्र शिक्षा अभियान मार्फत आयसीटी लॅब आणि लॅन्गवेज लॅब साठी संगणक प्राप्त झाले होते.
परंतु या संगणक लॅब साठी अद्यावत फर्निचर नव्हते.
आयडीबीआय बँकेकडून प्राप्त संगणक कक्षाचे बँकेचे जनरल मॅनेजर रवी असवानी यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी विनोद मदनानी ब्रांच मॅनेजर, मॅनेजर निखिलेश पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कार्यक्रमाचे संचालन तेजस्विनी देसले यांनी केले.
शाळेला प्राप्त लॅन्गवेज लॅब मध्ये सन्याको सॉफ्टवेअर...
जगातील उत्तम शिक्षण पद्धती म्हणून फिनलँड शिक्षण पद्धती ओळखली जाते आणि अशा देशातील सन्याको नावाचे सॉफ्टवेअर लॅन्गवेज लॅब मध्ये वापरले गेले आहे यामुळे मुलांचे भाषा कौशल्य, उच्चारण सुधारते.
यात प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येकी एक ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धक, ध्वनिमुद्रक, काही ध्वनिफिती इ. बाबी पुरविल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थी कक्षाचा संपर्क मुख्य नियंत्रक कक्षाशी जोडलेला आहे. या प्रयोगशाळेत स्वरविज्ञान महत्त्वाचे आहे. या ठिकाणी श्रवण करणे, प्रमाणित उच्चार कसे करायचे हे विद्यार्थी शिकतात. त्यातील स्वराघात समजून घेतात.
प्रत्येक विद्यार्थी आपल्या स्वतःच्या गतीनुसार शिकतो.
आवश्यकतेनुसार स्वतःच्या संभाषणामध्ये बदल घडून आणतो.
प्रास्ताविक मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी केले.
संगीत शिक्षक काकासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनात शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वतः संगीत साहित्य वाजवून स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगणक शिक्षक भरत फुसे , चंद्रप्रकाश जाधव, रश्मी होनमुटे, पूजा सोनवणे, सफा पठाण, स्वाती डिडोरे यांनी परिश्रम घेतले.
What's Your Reaction?






