मनपाच्या किराडपूरा शाळेत मतदार जनजागृती, काढली भव्य रैली
मनपा के. प्रा.शा किराडपुरा शाळेत मतदार जनजागृती उपक्रम
माझे आई बाबा मतदान करणारच!
माझे आजी आजोबा मतदान करणारच! घोषवाक्य द्वारे मतदान जनजागृती
औरंगाबाद, दि.5(डि-24 न्यूज) देशात लोकसभा सर्वत्रिक निवडणूक २०२४ ची प्रक्रिया सुरु झाली असून लोकशाहीच्या या उत्सवात जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी होऊन मतदान करावे या साठी महानगर पालिकेच्या किराडपुरा उर्दू नं १ विद्यालयात मतदार जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या यांच्या निर्देशानुसार शहरात विविध ठिकाणी मतदार जागृती कार्यक्रम सुरू आहेत.
या अनुषंगाने मनपा केंद्रिय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय किराडपुरा शाळेतील विद्यार्थ्यांनी रहीम नगर, बारी कॉलनी, किराडपुरा, सेंट्रल नाका या विभागात भव्य रॅली काढून जनतेला मतदान करण्याबाबत आवाहन केले. या वेळी मुख्याध्यापिका खान रईसा अय्युब खान व शिक्षक, विद्यार्थिनी पालकांची प्रत्यक्ष भेट घेऊन १५ मे २०२४ रोजी मतदान करण्याची विनंती केली. १८ वर्ष पूर्ण झालेल्या युवकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा अशा सुचना दिल्या.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापिका , सर्व शिक्षक सेवक वर्ग यांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांनी बँडच्या साथीने रॅली काढली. याप्रसंगी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. तसेच शाळेत एक सेल्फी पॉईंट तयार करून अनेक पालकांची सेल्फी घेऊन सोशल मिडियात व्हायरल करण्यात आले.
तसेच वर्ग ५ व ७ वी च्या विद्यार्थ्यांनी मतदान जागृती बाबत पथनाटय सादर केले.
तसेच पालकांसाठी
अभिप्राय लेखन स्पर्धा घेण्यात आली. ज्या पालकांनी सर्वोकृष्ट अभिप्राय लिहला त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. महिला पालकांसाठी मेहंदी स्पर्धा घेण्यात आली यात पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदान कण्यासाठी पोस्ट कार्ड वर पत्र लिहून मतदान जनजागृती करण्यात आली.या सोबतच विद्यार्थानी स्वतः मतदान जागृती बाबत घोषवाक्य तयार केले.
यात "माझे आई बाबा मतदान करणारच! माझे आजी आजोबा मतदान करणारच! असे घोषवाक्य तयार करून आपल्या परिसरात चिकटवले.अश्या विविध प्रकारे शाळेच्या वतीने मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.
What's Your Reaction?