माॅडल इंग्लिश हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण...
माॅडल हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज) - डॉ.रफिक झकेरिया कॅम्पस भडकल गेट येथील माॅडल हायस्कूल एण्ड रोझ अकादमी फाॅर टोडलर्स Annual Prize Distribution कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन आपल्या कलेचे प्रदर्शन केले. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा व विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या क्वालिटी एज्युकेशनची माहिती दिली. विविध पुरस्काराने शाळेला सन्मानित करण्यात आले आहे. शिक्षण महर्षी डॉ.रफीक झकेरिया यांनी या शाळेचा पाया रचला येथे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत भविष्य घडवीत आहे. या कार्यक्रमात आय लव औरंगाबाद फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा हिंदूस्थान दैनिकाचे संचालक इरबाज अन्सारी प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रगती करण्यासाठी अनमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.रफिक झकेरिया वूमेन्स काॅलेजचे प्राचार्य डॉ.मगदूम फारुकी, माॅडल हायस्कूलचे प्रिंसीपल शेख कौसर मॅडम, नुरुन्नीसा नायाब अन्सारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली
.
What's Your Reaction?