शहर विद्रूप करणा-या नागरीकांकडून मनपाने वसूल केला 12 लाख रुपये दंड

 0
शहर विद्रूप करणा-या नागरीकांकडून मनपाने वसूल केला 12 लाख रुपये दंड

शहर विद्रूप करणाऱ्या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई...

आता पर्यंत 12 लाखांचा दंड वसूल

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व उप आयुक्त तथा घन कचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विद्रूप करणाऱ्या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाईला 1 मार्च 2025 पासून सुरुवात करण्यात आली आहे.

   या मोहिमेत विविध 52 प्रकारात नागरिकांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे.

नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वाखाली 

दिनांक 1 मार्च ते 17 मार्च या कालावधीत 73 किरकोळ व्यापारी यांचे कडून प्रतिबंधित प्लास्टिक बाळगल्याबद्दल 69500/ दंड वसूल करण्यात येऊन 926 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले.

शहरात विविध ठिकाणी 23 नागरिकांकडून रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून रहदारीस अडथळा निर्माण केल्या बद्दल 1,88,000/ दंड वसूल करण्यात आला.

147 नागरिकांकडून रस्त्यावर कचरा फेकणे व जाळणे याबद्दल 62650/ दंड वसूल करण्यात आला. तसेच रस्त्यावर निष्काळजीपणे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या 156 चारचाकी वाहन धारकांकडून 06,24000/ दंड वसूल करण्यात आला.रस्त्यावर हातगाडी लाऊन वाहतुकीस अडथळा निर्माण केल्या बद्दल 12 हातगाड्या जप्त करून 24000/ दंड वसूल करण्यात आला.तसेच पाण्याचा गैर वापर करणे बाबत 15000/ ,मुख्य चौकात होर्डिंग्ज लावून विद्रुपी करण करणे बाबत 41 होर्डिंग्ज जप्त करून 82000/ व दुभाजक मधील पोल वरती छोटे बॅनर लाऊन विद्रुपी करणे बाबत 217 छोटे बॅनर जप्त करून 2,17,000/,तसेच 

विना परवानगी झाडे तोडणे या करिता 2 नागरिकांकडून 12000/- दंड वसूल करण्यात आला.

असे एकूण 12, 25, 650/ दंड वसूल करण्यात आला आहे.

सदर कारवाई नागरी मित्र पथक कर्मचारी यांनी

पार पाडली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow