सांडपाणी शुद्धीकरणात महापालिकेची उल्लेखनीय कामगिरी, मिळाले 5 कोटी 60 लाखांचे अनुदान...

 0
सांडपाणी शुद्धीकरणात महापालिकेची उल्लेखनीय कामगिरी, मिळाले 5 कोटी 60 लाखांचे अनुदान...

सांडपाणी शुद्धीकरण क्षेत्रात महानगरपालिकेची उल्लेखनीय कामगिरी

“जल ही अमृत” अभियानांतर्गत 5 कोटी 60 लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान प्राप्त

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज)-महानगरपालिकेच्या सांडपाणी शुद्धीकरण केंद्रांनी (STP) केंद्रीय शहरी कार्य मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या “CB Jal Hi Amrit – Round 3 Evaluation” या राष्ट्रीय स्तरावरील मूल्यांकनात उत्कृष्ट कामगिरी बजावून महानगरपालिकेस प्रोत्साहनपर अनुदान मिळवून दिले आहे.

या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पुढील सांडपाणी शुद्धीकरण केंद्रांना एकूण ₹5 कोटी 60 लाख रुपयांचे प्रोत्साहन बक्षीस प्राप्त झाले आहे –

क्रमांक सांडपाणी शुद्धीकरण केंद्र (STP) प्राप्त बक्षीस रक्कम

1. 161 MLD STP ₹ 3 कोटी 50 लाख

2. 35 MLD STP ₹ 70 लाख

3. 10 MLD STP ₹ 1 कोटी 40 लाख

या बक्षीसाद्वारे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने सांडपाणी शुद्धीकरण व्यवस्थापनात गुणवत्ता, कार्यक्षमता आणि पर्यावरणीय निकषांचे पालन यामध्ये आपली उत्कृष्टता सिद्ध केली आहे.

महानगरपालिकेच्या जलनिस्सारण विभागाच्या कार्यक्षम अंमलबजावणीमुळे आणि विभागीय अभियंते तसेच अधिकाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली आहे.

महानगरपालिकेच्या स्वतंत्र बँक खात्यात सदर बक्षीसाची एकूण रक्कम दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी जमा झालेली आहे.

या यशाबद्दल आयुक्त आणि प्रशासक यांनी शहर अभियंता फारुख खान आणि कार्यकारी अभियंता अनिल तनपुरे जलनिस्सारण विभाग तसेच सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले असून, सांडपाणी व्यवस्थापनातील ही प्रगती शहराच्या पर्यावरणीय टिकावासाठी महत्त्वाची ठरेल, असे त्यांनी नमूद केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow