सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनेच समोर आणली 36 हजार बोगस मतदारांची यादीने खळबळ...!

 0
सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनेच समोर आणली 36 हजार बोगस मतदारांची यादीने खळबळ...!

सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनेच समोर आणली 36 हजार बोगस मतदारांची यादी....

गंगापूर तालुक्यात 36 हजार मतदार बोगस असल्याचा दावा, कार्यवाईची मागणी, कार्यवाई झाली नाही तर न्यायालयात जाणार...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज)- लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादीत बोगस मतदार असल्याचा आरोप निवडणूक आयोगावर केला होता. परंतु सत्ताधारी अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनी गंगापूर विधानसभा मतदारसंघात 36 हजार बोगस मतदार असल्याची यादीच पत्रकार परिषदेत दाखवल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. त्यांनी या घोटाळ्याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी यांच्याकडे आक्षेप दाखल केला तरीही कार्यवाही होत असल्याचा आरोप त्यांनी प्रशासनावर केला आहे.

पुढे बोलताना पदवीधर मतदार संघाचे आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले गंगापूर विधानसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढली होती. जिल्हा प्रशासनाने जवाबदार अधिका-यांवर कडक कारवाई करावी, हा संघटीत अपराध आहे, कार्यवाही केली नाही तर न्यायालयात जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

एकाच पत्त्यावर 171 मतदारांचे नाव...

गंगापूर विधानसभा मतदारसंघात मौजे रांजणगाव शेणपुंजी येथे एका असे नावे मतदार यादीत टाकण्यात आले ते लोक याठिकाणी राहत नाही. बोगस नावे नोंदणी करण्यात आली. एकाच घराच्या पत्त्यावर 171 नावे टाकली, नाव, लिंग, वय समान आहेत. यामुळे हे सिद्ध होते प्रशासनातील अधिकारी यांच्याशी मिलिभगत करुन 36 हजार बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली. या घोटाळ्याला विधानसभा क्षेत्राचे बीएलओ जवाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सतीश चव्हाण यांनी केली आहे.

विरोध असताना सुद्धा निवडणूक आयोग करत नाही कार्यवाई...

लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे निवडणूक आयोगाकडून मतदार यादी तयार करण्याचे काम राज्य निवडणूक आयोग करत आहे. यावर सतीश चव्हाण यांनी आक्षेप घेत मतदार यादीत झालेला घोळ असल्याने आक्षेप व सूचना अगोदरच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गंगापूर तालूका अध्यक्ष संजय जाधव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आक्षेप दाखल केला आहे.

दत्त नगर नाही तरीही तेथे हजारो मतदार...

बीएलओच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत चव्हाण यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले गंगापूर विधानसभा मतदारसंघात दत्तनगर नाही तरीही या पत्त्यावर हजारो मतदारांची नावे यादीत आहे. मतदार यादी तयार करणे आणि निवडणुकीचे निकाल पारदर्शी करण्याचे काम निवडणूक आयोगाकडून अपेक्षित आहे परंतु यादीत बोगस नावे शोधण्याची मागणी राजकीय पक्षांकडून केली जात आहे.

बीएलओवर केले गंभीर स्वरुपाचे आरोप...

आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला तर बीएलओने त्या पत्त्यावर जाऊन बघावे तो व्यक्ती तेथे राहतो का हे बघायला हवे हा नियम आहे. निवडणूक निर्णय अधिकारी नोंदणी केलेल्या मतदारांची नावे प्रकाशित करायला हवी त्यानंतर आक्षेप व सूचना मांगवली पाहिजे परंतु बोगस नावे यादीत असून सुद्धा प्रशासन ती नावे यादीत समाविष्ट केली. यावर आमदार सतीश चव्हाण यांनी आक्षेप घेत राग व्यक्त केला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow