मते घेण्यासाठी लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना, निवडणुकीनंतर गायब होतील या योजना- इम्तियाज जलील
मते घेण्यासाठी लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना, निवडणुकीनंतर गायब होतील या योजना- इम्तियाज जलील
अजित पवारांनी नाव बदलून विमानात प्रवास केल्याचा प्रश्न गंभीर या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे....मार्टीला ते मंजूरी देणार नाही त्यांच्याकडून अपेक्षा नाही...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.30(डि-24 न्यूज) अजित पवार हे जेव्हा विरोधीपक्षनेते होते मुंबई ते दिल्ली वेशभुषा बदलून ओळख बदलून विमानात प्रवास करुन अमित शाह यांना भेटण्यासाठी जात होते हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी टिका केली व हा प्रश्न गंभीर आहे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा मागणी केली. माजी खासदार तथा एम आय एम चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनीही या प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले मुंबई ते दिल्ली प्रवास विमानात केले तर तीन ते चार ठिकाणी विमानतळावर ओळखपत्र बघितले जाते. तेथील सुरक्षा व्यवस्था कडक असते तरीही अजित पवार यांनी प्रवास केला तर मग सुरक्षा व्यवस्था बघणारे काय करत होते. गुप्तचर विभाग काय करत होते हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न आहे. पवारांनी आपला खोटा ओळखपत्र बणवले होते का...? याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मार्टीची स्थापना अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंजूर झाली होती परंतु अजित पवार यांच्या वित्त विभागाने या प्रस्तावाला फुली मारली यावरून असे दिसून येते यांची मानसिकता काय आहे. अजित पवार हे भाजपाच्या नावात बसलेले आहेत आणि भाजपाचे धोरण आहे मुस्लिम अल्पसंख्याक समाजाशी त्यांचे काही देणेघेणे नाही म्हणून हा प्रस्ताव फेटाळला गेला असावा असे इम्तियाज जलील यांनी माध्यमांना बोलताना प्रतिक्रिया दिली.
लाडकी बहीण, लाडका भाऊ या योजनेवर सुध्दा त्यांनी टिका केली.अशा योजनेमुळे भ्रष्टाचार वाढेल. मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हि योजना आणली आहे. मते घेण्यासाठी थेट मतदारांच्या खात्यात पैसे टाकून तुम्ही आम्हाला मते देऊन हेच सरकार आणा या उद्देशाने हि योजना बनवली गेल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक झाल्यानंतर ह्या योजना गायब होतील असाही आरोप त्यांनी केला.
What's Your Reaction?