तरंग मेळाव्यात 42 लाख 50 हजार रुपयांच्या मालाची विक्री...!

तरंग मेळाव्यात 42 लाख 50 हजार रुपयांच्या मालाची विक्री
छ.संभाजीनगर दि.30(डि-24 न्यूज) नाबार्ड, लघु शेतकरी कृषी संघ आणि खुले डिजीटल वाणिज्य संस्थान (ओएनडीसी) यांच्यावतीने शेतकरी उत्पादक कंपनी निर्मित कृषी उत्पादनांच्या प्रचार, प्रसार आणि विक्रीसाठी ‘तरंगः शेतकरी उत्पादक कंपन्यांचा मेळावा’ शनिवार दि.27 ते सोमवार दि.29 दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या तीन दिवसीय मेळाव्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादन केलेल्या 42 लाख 50 हजार रुपयांच्या मालाची विक्री झाली.
उद्घाटनप्रसंगी नाबार्डचे महाप्रबंधक प्रदीप पराते, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, महाराष्ट्र ग्रामिण बॅंकेचे व्यवस्थापक डी. एम. कावेरी, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक मंगेश केदार, बॅंक ऑफ महाराष्ट्र चे उपमहाव्यवस्थापक विवेक, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक सुरेश पटवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्यात शेतकरी बांधवांना तीनही दिवस बँकर्स, स्मार्ट योजना, पशुसंवर्धन योजना, ॲग्रो स्टार्ट अप आणि सायन्स फॉर सोसायटी, कंपनी कायदा या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, सातारा, पुणे, नगर, लातूर, वाशिम, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यातील एकूण 40 शेतकरी उत्पादक कंपन्यांचे उत्पादन विक्री स्टॉल लावण्यात आले होते. हळद, मिरची पावडर, ज्वारी, बाजरी, खपली गहू, डाळ, तांदूळ, मध, तेल, चंदन उत्पादने, अगरबत्ती, खत असे अनेकविध सेंद्रिय आणि इतर उत्पादने मोठ्या प्रमाणावर विक्री झाले. त्यातून शेतकरी उत्पादक कंपन्यांना 42 लाख 50 हजार रुपये मिळाले,असे आयोजकांनी सांगितले. मेळाव्यात कृषी विभाग, बँक, पशुसंवर्धन विभाग, शेतकरी उत्पादक कंपन्या यांचे प्रतिनिधी यांनी हजेरी लावली. शहरवासियांचा चांगला प्रतिसाद लाभला
.
What's Your Reaction?






