राष्ट्रीय लोकअदालत- 6724 प्रकरणे सामोपचाराने निकाली

राष्ट्रीय लोकअदालत- 6724 प्रकरणे सामोपचाराने निकाली
छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.30(डि-24 न्यूज) – जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवारी (दि.27) आयोजित लोक अदालतीमध्ये एकूण 6724 प्रकरणात सामोपचार होऊन होऊन 60 कोटी 31 लक्ष 89 हजार 359 रुपये इतक्या रकमेची प्रकरणे निकाली निघाली, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती वैशाली फडणीस यांनी कळविले आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा व सत्र न्यायालय येथे शनिवारी (दि.27) प्रलंबित व वादपूर्व प्रकरणांच्या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश व्ही.पी.इंगळे यांच्या मार्गदर्शानाखाली हे आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीत मोटार अपघात, विघुत चोरी, धनादेश अनादर, कौटुंबिक, भूसंपादन व तडजोडयुक्त दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली. तसेच वादपूर्व प्रकरणामध्ये युनियन बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, महाराष्ट्र बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युको बँक, एस.बी.आय.क्रेडीट, आय.सी.आय.सी.आय.बँक, जॉन डिअर फायनान्स, उज्जीवन स्मॉल फायनान्स्स, व्होडाफोन, एल.ॲण्ड टी फायानान्स, धनी लोन्स फायनान्स्स, आय.सी.आय.सी.आय.बँक, आणि मध्यस्थी केंद्रामधील वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती.
लोकअदालतीध्ये एकूण 18 पॅनल करण्यात आले. सर्व न्यायाधीशांनी त्यावर आपले योगदान दिले. या लोकअदालतीत 3031 प्रलंबित व 3693 दाखलपूर्व अशा एकूण 6724 प्रकरणांमध्ये कामकाज झाले. या प्रकरणांमध्ये प्रलंबित प्रकरणांत 6 कोटी 39 लाख 89 हजार 102 रुपये तर वादपूर्व प्रकरणांमध्ये 53 कोटी 92 लक्ष 257 रुपये अशी एकूण 60 कोटी 31 लक्ष 89 हजार 359 रुपये वसुली झाली व पक्षकरांना न्याय मिळाला, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती वैशाली पी.फडणीस यांनी कळविले आहे.
What's Your Reaction?






