पैठण-फुलंब्री मतदारसंघ निहाय प्रशिक्षण, निवडणूक कामकाज करण्याची संधी हि अभिमानाची बाब- जिल्हाधिकारी

 0
पैठण-फुलंब्री मतदारसंघ निहाय प्रशिक्षण, निवडणूक कामकाज करण्याची संधी हि अभिमानाची बाब- जिल्हाधिकारी

पैठण व फुलंब्री मतदारसंघनिहाय प्रशिक्षण

निवडणूक कामकाज करण्याची संधी

ही अभिमानाची बाब- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

औरंगाबाद, दि.5 (डि-24 न्यूज) आपण या देशाचे नागरिक आहोत, आपण या लोकशाहीचा महत्त्वाचा उत्सव असणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत कामकाज करण्याची संधी ही एक अभिमानाची बाब आहे. निवडणूक कामकाजाकडे सकारात्मकतेने पहा व कामकाज करा,अशा शब्दात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पैठण येथे निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणा दरम्यान प्रोत्साहित केले.

            लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने ११० पैठण व १०६ फुलंब्री विधानसभा क्षेत्रनिहाय केंद्राध्यक्ष व सहा. मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण पार पडले. पैठण येथे श्रीनाथ हायस्कूल मध्ये प्रशिक्षण पार पडले. तेथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी , सहा. निवडणूक निर्णय अधिकारी नीलम बाफना, तहसिलदार सारंग चव्हाण सर्व झोनल व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. तर फुलंब्री साठी युनिव्हर्सल हायस्कूल चिकलठाणा येथे प्रशिक्षण पार पडले. तेथे जिल्हाधिकारी स्वामी यांच्यासह सहा. निवडणुक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी , तहसिलदार कृष्णा कानमुळे आदी उपस्थित होते.

            पैठण येथे पहिल्या सत्रात ५४५ तर दुसऱ्या सत्रात ४४५ कर्मचारी प्रशिक्षणासाठी उपस्थित होते. फुलंब्री मतदार संघासाठी ५०८ कर्मचारी प्रशिक्षणासाठी उपस्थित होते. या सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली. तसेच मतदान यंत्र, व्हिव्हिपॅट यंत्र इ. आवश्यक सामुग्री प्रत्यक्ष हाताळण्याचे प्रात्यक्षिक देण्या

त आले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow