पूर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने घेतले मेगा ब्लड डोनेशन कॅम्प, शेकडो तरुणांनी केले रक्तदान
औरंगाबाद पूर्व मतदारसंघात काँग्रेसने घेतले मेगा ब्लड डोनेशन कॅम्प....
डॉ.सरताज पठाण यांचा पुढाकार, शेकडो तरुणांनी केले रक्तदान...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज) मेगा ब्लड डोनेशन कॅम्पचे आयोजन काँगेस पक्षाचे नेते डॉ.सरताज पठाण यांनी आझम कॉलोनी रोशनगेट येथे आयोजीत केले होते. या रक्तदान शिबीराचे उदघाटन शहर जिल्हा काँगेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्या हस्ते करण्यात आले. नागरीकांनी रक्तदान शिबीराला भेट देउन रक्तदान करावे. कारण रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. अशी प्रतिकीया कार्यकमाचे आयोजक डॉ.सरताज पठाण यांनी व्यक्त केले. या रक्तदान शिबिरात शेकडो युवकांनी रक्तदान केले. संजिवनी ब्लड बँकेने रक्त संकलनाचे काम केले.
डॉ.सरताज पठाण यांनी शहरात नशामुक्त अभियान सुरू केले आहे. वृक्षारोपण सुरू आहे आणि नेहमी सामाजोपयोगी उपक्रम राबवून जास्तीत जास्त नागरिकांना फायदा होईल असे काम करत असल्याने त्यांची शहरात लोकप्रियता वाढलेली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ते औरंगाबाद पूर्व विधानसभेसाठी इच्छुक आहेत.
यावेळी शहर जिल्हा काँगेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ, काँगेस पक्षाचे नेते डॉ.सरताज पठाण, डॉ .जफर अहमद खान, महीला काँग्रेसच्या अध्यक्षा दिपाली मिसाळ, डॉ.पवन डोंगरे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आकेफ रजवी, शहर जिल्हा काँगेस कमिटीचे सरचिटणीस अनिस पटेल, शहर जिल्हा दीपाली मिसाळ अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष मोईन ईनामदार, विज्ञान तंत्रज्ञान कौशल्य सेलचे अध्यक्ष शेख रईस, पवण डोंगरे अथर शेख अमेर अब्दुल सलीम परिवहन विभागाचे अध्यक्ष आसमत खान, नगरविकास सेलचे अध्यक्ष साहेबराव बनकर, डॉ फिरोज पठाण डॉ मिनहाज पठाण पर्यावरण विभागाचे अध्यक्ष एम.ए.अझर, मेराज पठाण राशन दुकानदार सेल चे अध्यक्ष सलीम खान, सयद फयाजोददीन, अकलाख शेख, सुनील साळवे मामा, बारी सर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, व पुर्व विधानसभेचे नागरीक रक्तदान शिबीराला उपस्थित हो
ते.
What's Your Reaction?