मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारक, सुधारीत प्रस्ताव तात्काळ सादर करा- पालकमंत्री अब्दुल सत्तार

 0
मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारक, सुधारीत प्रस्ताव तात्काळ सादर करा- पालकमंत्री अब्दुल सत्तार

मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारक;सुधारित प्रस्ताव

तात्काळ सादर करा- पालकमंत्री अब्दुल सत्तार

छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.3(डि-24 न्यूज) मराठवाडा मुक्ती संग्रामाची जाज्वल्य आठवण म्हणून मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारकाची निर्मिती करण्यात येणार असून ही निर्मिती परिपूर्ण व्हावी यासाठी सुधारणा व नविन बाबींचा समावेश आराखड्यात करुन सुधारीत प्रस्ताव शासनास तात्काळ सादर करावा असे निर्देश राज्याचे पणन वअल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दिले.  

मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारकासंदर्भात आज पालकमंत्री सत्तार यांच्या समोर सादरीकरण करण्यात आले. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, लोकसभा सदस्य खासदार कल्याण काळे, आ. रमेश बोरनारे, आ. प्रदीप जयस्वाल, आ. उदयसिंह राजपूत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर मुख्य अभियंताभगत यांच्यासह संबंधित अधिकारी कर्मचारी बैठकीस उपस्थित होते . 

 माहिती देण्यात आली की, मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारकांमध्ये संत दर्शन गॅलरीमध्ये विविध संतांच्याआभासी प्रतिमा प्रदर्शित केली जाणार आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आठ स्तंभाचे,आणि जिल्ह्याची ओळख दर्शवणाऱ्या महत्त्वाच्या घटकांचे प्रतिबिंब यामध्ये असणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामात ज्या हुतात्म्याने बलिदान दिले. त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमा या ठिकाणी असणार आहेत. आर्ट गॅलरी ,अजिंठा आणि वेरूळ येथील लेण्यातील चित्रे साकारली जाणार आहेत. ग्रंथालयामध्ये मराठवाड्याचा इतिहास दर्शवणाऱ्या माहितीपटाचे सादरीकरणही करण्यात येणार आहे. या स्मारकास भेट देणाऱ्या पर्यटक, विद्यार्थी विविध ठिकाणाहून येणाऱ्या नागरिकांसाठी मराठवाडा मुक्ती संग्राम या स्मारकाच्या माध्यमातून समजणार आहे. याबाबत सुधारीत प्रस्ताव सादर करावा असे पालकमंत्री सत्तार यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow