इम्तियाज जलील यांच्या प्रयत्नांना यश, आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियमला मिळाली मान्यता...!

 0
इम्तियाज जलील यांच्या प्रयत्नांना यश, आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियमला मिळाली मान्यता...!

माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रयत्नांना यश, आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम बणवण्यास मिळाली मान्यता...

छ. संभाजीनगर(औरंगाबाद),दि.6(डि-24 न्यूज) शहरातील वक्फ बोर्डाच्या मालकीच्या ऐतिहासिक आमखास मैदानावर नवीन आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियमला पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतलेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकारी यांनी क्रीडा विभागास सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिले.

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असल्याचे या मान्यतेमुळे दिसून येत आहे. दरवर्षी इम्तियाज जलील हे आयजे फेस्टिव्हलमध्ये विविध खेळ प्रकारांच्या या मैदानावर स्पर्धा घेतात. या मैदानावरुन शहर व जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावे यासाठी या मैदानावर आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम बनावे यासाठी मागील वर्षी मुख्यमंत्री सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी येथे स्टेडीयमचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन इम्तियाज जलील यांना आयजे फेस्टिव्हलमध्ये दिले होते. आज झालेल्या निर्णयानुसार हे स्वप्न साकार होईल असे वाटत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी हा निर्णय झाला आहे. यामुळे खेळाडूंसाठी आनंदाची बातमी आहे.

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow