उस्मानाबाद नामांतराची याचिका फेटाळली औरंगाबादची नाही - याचिकाकर्ते मुश्ताक अहमद
उस्मानाबाद नामांतराची याचिका फेटाळली औरंगाबादची नाही - याचिकाकर्ते मुश्ताक अहमद
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.7(डि-24 न्यूज) सर्वोच्च न्यायालयात उस्मानाबादचे नामांतर धाराशिव केल्याच्या सरकारच्या विरोधात निर्णयावर उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यासोबतच औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर विरोधात सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केली आहे. उस्मानाबाद शहर नामांतराची याचिका फेटाळली गेली आहे औरंगाबादची नाही . औरंगाबाद प्रकरणात 9 ऑगस्ट रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. काही माध्यमातून औरंगाबाद नामांतराची याचिका फेटाळली अशा अफवा पसरवणाऱ्या बातम्या प्रकाशित केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. अशी माहिती पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नामांतर विरोधी कृती समितीच्या वतीने याचिकाकर्ते मुश्ताक अहमद यांनी दिली आहे.
विशालगडाच्या घटनेची निष्पक्ष चौकशी सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेत करुन हिंसा करणा-यांना कडक शासन करण्यात यावे अशी मागणी सरकारकडे मुश्ताक अहमद यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आले. मुस्लिम अल्पसंख्याक समाजाने एकगठ्ठा मते दिली तरीही एकही उमेदवार मुस्लिम दिला नसल्याने समाजात नाराजी आहे. विधानपरिषदेत दोन मुस्लिम सदस्य होते त्याचा कार्यकाळ पूर्ण झाला. त्यानंतर एकही मुस्लिम उमेदवार विधानपरिषद निवडणुकीत दिला नसल्याने समाजात नाराजी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना उध्दव ठाकरे 12 जागा, काँग्रेस 12 जागा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने 12 जागा असे 36 जागेवर मुस्लिम उमेदवार देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. या निवडणुकीत महाविकास आघाडीने अल्पसंख्याक समाजाला योग्य प्रतिनिधित्व दिले नाही महाराष्ट्र नामांतर विरोधी कृती समिती वेगळी भुमिका घेणार असल्याचा इशारा यावेळी मुश्ताक अहमद यांनी दिला आहे.
यावेळी काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष हमद चाऊस, इलियास किरमानी, अॅड नवाब पटेल, मोहसीन अहेमद, समाजवादी पक्षाचे अब्दुल रऊफ, मुन्नाभाई, अश्रफ पठाण, तय्यब खान आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?