रेल्वेने एका दिवसात 2.76 लाख प्रवाशांची वाहतूक यशस्वीपणे हाताळली...
रेल्वेत प्रवाशांची गर्दी, दिवाळीच्या सुट्टीत रेल्वे वाहतूक यशस्वीपणे हाताळली
नांदेड विभागाने एका दिवसात 2.76 लाख प्रवाशांची रेल्वे वाहतूक यशस्वीपणे हाताळली
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज) - दिवाळीच्या सुटीनंतर परतणाऱ्या प्रवाशांच्या प्रचंड गर्दीचा सामना करत, नांदेड विभागाने दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी एका दिवसात एकूण 2.76 लाख प्रवाशांची रेल्वे वाहतूक यशस्वीरीत्या हाताळली.
दिनांक 26 ऑक्टोबर त्या दिवशी हजूर साहेब नांदेड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या प्रमुख स्थानकांवर प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली.
दिनांक 26 ऑक्टोबर त्या दिवशी हजूर साहेब नांदेड स्थानकावर 2025 मध्ये 71,896 प्रवासी नोंदवले गेले, जे मागील वर्षीच्या दररोज सरासरी 44,609 प्रवाशांपेक्षा खूप जास्त आहेत.
परभणी स्थानकावर 39,056 प्रवासी, तर छत्रपती संभाजीनगर स्थानकावर 49,078 प्रवासी प्रवास करताना नोंदवले गेले, जे अनुक्रमे मागील वर्षीच्या सरासरी 26,157 व 31,436 प्रवाशांपेक्षा जास्त आहेत.
26 ऑक्टोबर 2025 रोजी नांदेड विभागाने एकूण 2,76,199 प्रवाशांची वाहतूक केली, ज्यात 57,765 आरक्षित प्रवासी आणि 2,18,434 अनारक्षित प्रवासी यांचा समावेश होता.
प्रवाशांच्या सोयीसाठी विभागाने दिवाळी विशेष गाड्या चालवल्या तसेच काही नियमित गाड्यांना अतिरिक्त डबे जोडले. तसेच, प्लॅटफॉर्मवरील गर्दी टाळण्यासाठी आणि रेल्वे सेवा सुरळीत ठेवण्यासाठी विभागाने उच्च दर्जाची वेळपालनता (पंक्चुअॅलिटी) राखली.
सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी विभागाने अनेक उपाययोजना केल्या — ज्यामध्ये अधिक कर्मचारी नियुक्त करणे, गर्दी नियंत्रण व्यवस्था, प्रवासी मार्गदर्शन, सुरक्षा उपाय मजबूत करणे तसेच रेल मदत आणि स्टेशन हेल्पडेस्कद्वारे तत्काळ सहाय्य उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे.
वरील सर्व उपाययोजना श्री प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविण्यात आल्या.
What's Your Reaction?