महीला डॉक्टरच्या आत्महत्या घटनेच्या निषेधार्थ युवक काँग्रेस अक्रामक
महीला डॉक्टरच्या आत्महत्या घटनेच्या निषेधार्थ युवक काँग्रेस अक्रामक
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज)- फलटण जिल्हा सातारा येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सदरील घटनेच्या निषेधार्थ कॅण्डल पेटवून प्रदेश युवक काँग्रेसकडून प्रदेश सचिव इंजिनियर मोहसीन खान यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.आज रोशन गेट येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव इंजिनियर मोहसीन खान यांनी फलटण जिल्हा सातारा येथील डॉक्टर स्वर्गीय महीला डॉक्यांटरला पोलीस प्रशासन व राजकीय दबावामुळे आत्महत्या केली या अत्यंत दुःखद घटनेच्या निषेध म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव इंजिनियर मोहसीन खान यांनी श्रद्धांजलीपर कार्यक्रम घेतला व कँडल लावून मौन धरून श्रद्धांजली वाहण्यात आली व संबंधित आरोपीविरुद्ध फास्टट्रॅक कोर्टात खटला चालविण्याची मागणी केली तसेच उच्चस्तरीय एसआयटी नेमून लवकरात लवकर सखोल चौकशी करण्याची मागणी केली. श्रद्धांजलीपर कार्यक्रमांमध्ये कॅण्डल लावून दोन मिनिटं श्रद्धांजली वाहण्यात आली व पोलीस प्रशासनातील काही आरोपी व राजकीय वरदहस्त असलेले काही आरोपी असू शकतात याबद्दल एसआयटी नेमून सखोल चौकशी करण्याची मागणी व डॉक्टर महीलेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी रोष व्यक्त केला. श्रद्धांजली पण कार्यक्रमांमध्ये पैठणचे माजी आमदार संजय वाकचौरे, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक कमिटीचे उपाध्यक्ष इब्राहिम पठाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माजी शहर जिल्हाध्यक्ष एड सय्यद अक्रम , डॉ. सरताज पठाण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवीद शेख (दादा), महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सचिव इंजिनिअर इफ्तेखार, युवक काँग्रेस प्रदेश सचिव इरफान इब्राहिम पठाण, माजी एन. एस .यू. आय. अध्यक्ष इम्रान पठाण , राजीव गांधी पंचायत राज शहर अध्यक्ष इमरान शेख, आरोग्य सेलचे अध्यक्ष रईस शेख, सलमान खान, मयूर गायकवाड, जाकीर शेख, जे.के., जावेद पठाण, अमीन पठाण, इत्यादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?