शहरात मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला सुरुवात, पहिल्याच दिवशी 3148 घरांचे केले सर्वेक्षण
 
                                शहरात मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला सुरुवात, पहिल्याच दिवशी 3148 घरांचे केले सर्वे
औरंगाबाद, दि.24(डि-24 न्यूज) मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने मंगळवार, 23 जानेवारी 2024 पासून शहर आणि जिल्ह्यात पाहणी सुरु केली आहे. शहरातील 115 वार्डात व 9 तालुक्यात एकाचवेळी पाहणीस प्रारंभ झाला आहे. खुल्ह्यासह इतर मागासवर्गीय प्रवर्गाची नोंद पाहणीत होत आहे. महानगरपालिका हद्दीत पहील्याच दिवशी दहा झोनमध्ये 3148 घरांची पाहणी करण्यात आली असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.
5 हजारांहून अधिक कर्मचारी या कामात गुंतले आहे. अनेक ठिकाणी पाहणी दरम्यान अॅप ओपन करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. शहरात या पाहणीसाठी 1830 कर्मचारी नेमले आहेत त्यामध्ये 230 महापालिकेचे कर्मचारी आहेत. शंभर रुपये प्रती घर मानधन दिले जात आहे. एका कुटुंबाला 183 प्रश्न विचारले जात आहे. शंभर घरांचे टार्गेट दिले आहेत. मराठवाड्यात 40 हजारांच्या आसपास कर्मचारी पाहणी काम बघत आहे.
औरंगाबाद शहरातील 10 झोनमध्ये पहिल्या दिवशी 3148 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये झोन-1 मध्ये 358, झोन-2 मध्ये 311, झोन-3 मध्ये 636, झोन-4 मध्ये 216, झोन-5 मध्ये 515, झोन-6 मध्ये 237, झोन-7 मध्ये 00, झोन -8 मध्ये 359, झोन-9 मध्ये 190, झोन-10 मध्ये 326 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            