शिक्षकांच्या बदल्यात घोळ, प्रशासनाच्या आश्वासनानंतर आमरण उपोषण मागे

प्रशासनाच्या लेखी आश्वासनामुळे आमरण उपोषणाची सांगता
चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे प्रशासनाचे लेखी आश्वासन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज) -
जिल्हा परिषद शिक्षकांच्या 2025 मधील सार्वत्रिक बदल्यामध्ये प्रचंड अनियमितता झाली या अनियमितता करणाऱ्या शिक्षकांवर सहभागी अधिकारी व कर्मचारी चौकशी समिती नेमून कारवाई करा. या मागणीसाठी शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस रंजित राठोड यांनी 22 सप्टेंबर पासून आमरण उपोषण आंदोलन चालू केले होते. अखेर आज प्रशासनाने अनियमितता करणाऱ्यांची यादीच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवून दिली व तसे लेखी पत्र उपोषणकर्ते रंजित राठोड यांना दिले यावेळी फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनुराधाताई चव्हाण, शिक्षक समितीचे राज्य नेते उदयजी शिंदे, राज्य सरचिटणीस राजन कोरेगावंकर, जिल्हाध्यक्ष विजय साळकर, राज्य उपाध्यक्ष आनंदा कांदळकर, राज्य प्रवक्ते नितीन नवले, मराठवाडा अध्यक्ष श्याम भाऊ राजपूत, मराठवाडा संघटक राऊफ पठाण, राज्य संघटक दादा जांबवडेकर, जिल्हा उपाध्यक्ष चंदू लोखंडे, कडूबा साळवी, केळी मगर, दिलीप रासने, प्रसिध्दी प्रमुख सतीश कोळी, सोयगाव तालुकाध्यक्ष गजानन वरकड, अशोक डोळस, कैलास ढेपले, दत्ताभाऊ खाडे, पंजाबराव देशमुख, शिवाजी डुकरे, बबन चव्हाण, विलास चव्हाण, उपाध्यक्ष विजय पवार, विष्णू भंडारी जिल्हा नेते, शिक्षक भारतीच्या जिल्हा अध्यक्षा सुषमा खरे यांच्या पुढाकाराने चर्चा अंती कार्यवाईचे लेखी पत्र देण्यात आले व आमदार महोदयांनी पत्र देण्यासाठी आलेल्या उपशिक्षणाधिकारी गीता तांदळे मॅडम यांच्या कडून शिक्षणाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना शब्द दिला की, या पत्राप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवलेल्या यादीनुसार बोगस शिक्षकांवर कारवाई येत्या पंधरा दिवसात करून आपल्या कार्यालयात तसे कळविण्यात येईल. शिक्षक समिती या संघटनेला देखील तसा अहवाल देण्यात येईल. या लेखी आश्वासनानंतर गेल्या 3 दिवसांपासूनच्या आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली.
प्रतिक्रिया... 2025 च्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या एक महिना झाला तरी सुद्धा कार्यमुक्त केले जात नव्हते शिक्षक समितीने बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करावी व माहिती भरून बोगस बदली केलेल्या शिक्षकांवर कारवाई करावी यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन 22 सप्टेंबर पासून सुरू केली होती जिल्हा परिषदेने बदली झालेल्या शिक्षकांना अखेर कार्यमुक्त केले व बोगस माहिती भरून बदली केलेल्या शिक्षकावर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले म्हणून शिक्षक समितीने बेमुदत अन्नत्याग आंदोलन आज मागे घेतले. विजय साळकर जिल्हाध्यक्ष शिक्षक समिती छत्रपती संभाजीनगर
What's Your Reaction?






