डिजिटल मीडीया परिषदेच्या अधिवेशनात राज्यभरातून पत्रकार येणार - एस.एम.देशमुख

"डिजिटल मिडिया परिषदेच्या"
अधिवेशनास राज्यभरातून
पत्रकार येणार : एस.एम.देशमुख
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज) अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची एक विंग असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी, सकाळी 11 वाजता संभाजीनगर येथे होत असून अधिवेशनास एक हजार पत्रकार उपस्थित राहतील असा विश्वास एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केला आहे. या अधिवेशनात जास्तीत जास्त संख्येने पत्रकारांनी उपस्थित राहावे. डिजिटल मीडीया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकार यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी वेगळी विंग तयार करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांची यावेळी निवड करण्यात येईल. डिजिटल मीडीया पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.
डिजिटल मिडियातील पत्रकारांची संख्या उत्तरोत्तर वाढत असून त्यांना संघटीत करून त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत अधिवेशनात विचार विनिमय करून ठोस भूमिका घेतली जाणार आहे.
क्रांती चौक परिसरातील एकनाथ रंगमंदिर येथे पालकमंत्री संजय शिरसाट आणि कँबिनेट मंत्री अतुलजी सावे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून एस.एम.देशमुख अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी असतील.. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत..
"मुक्तपीठ" चे संपादक आणि नवा काळचे सल्लागार संपादक तुळशीदास भोईटे आणि "अभिव्यक्ती" युट्यूब चँनलचे संपादक रवींद्र पोखरकर मुख्य वक्ते म्हणून उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करणार आहेत.
डिजिटल आणि प्रिन्ट मिडियातील पत्रकारांनी अधिवेशनास मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई, डिजिटल मिडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे, कार्यक्रमाचे संयोजक तथा संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी यांनी केले आहे..
अधिवेशनात उत्कृष्ट युट्यूब चँनल चालवून ते यशस्वी करून दाखविणा-या काही संपादकांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती अनिल वाघमारे यांनी दिली.
अधिवेशनास स्थानिक निवृत्त मान्यवर पत्रकारांचा ही सन्मान करण्यात येणार आहे. तसेच डिजिटल मिडिया परिषदेची राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे.
डिजिटल मिडिया परिषदेचे हे अधिवेशन ऐतिहासिक ठरेल असा विश्वास एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
What's Your Reaction?






