कुख्यात गुंड, रोड रोमीयो, अंमली पदार्थ विक्रेत्याची पोलिसांनी काढली धिंड...

 0
कुख्यात गुंड, रोड रोमीयो, अंमली पदार्थ विक्रेत्याची पोलिसांनी काढली धिंड...

कुख्यात गुंड, रोड रोमीयो, अंमली पदार्थ विक्रेत्याची पोलिसांनी काढली धिंड...

आज शहरात तीन ठिकाणी पोलिसांनी काढली आरोपींची धिंड, एमजीएम विद्यापीठ परिसरात गाडीचे हरण वाजवणा-या रोड रोमीयोची काढली धिंड..‌

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज) आज शहरात तीन ठिकाणी कुख्यात गुंड, रोड रोमीयो व अंमली पदार्थ विक्रेता असे तीन आरोपिंची शहर पोलिसांनी धिंड काढली असता बघ्यांची गर्दी जमली होती. या आरोपिंना धडा शिकविण्यासाठी पोलिसांनी धिंड काढली असे दिसून येत आहे. त्यांना पायी त्या त्या परिसरात हातात हतकडी घालून फिरवण्यात आले. 

गारखेडा परिसरातील कुख्यात गुन्हेगार शेख जावेद उर्फ टिप्या याच्यासह किराडपुरा भागात अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या रियाज नजीर शेख या आरोपींची शहर पोलिसांच्या वतीने शुक्रवार, 12 सप्टेंबर रोजी विविध भागात धिंड काढण्यात आली. कुख्यात गुन्हेगारांची आणि अंमली पदार्थ विक्रेत्यांची धिंड काढून त्यांची लोकांच्या मनात असलेली दहशत कमी करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या वतीने करण्यात येत असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली.

गारखेडा परिसरातील पुंडलिकनगरातील रहिवासी असलेला कुख्यात गुंड शेख जावेद उर्फ टिप्या याने तीन वर्षापूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास गारखेडा परिसरातील मुख्य रस्त्यावर दारु पिऊन मैत्रिणीसोबत कारच्या टपावर उभे राहुन नृत्य करीत धिंगाणा घातला होता. त्याच रस्त्यावर पुंडलिकनगर पोलिसांनी शेख जावेद उर्फ टिप्याची धिंड काढून त्याला रस्त्यावरुन फिरवले. तसेच किराडपूरा व अन्य भागात अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या रियाज नजीर शेख यांची जिन्सी पोलिसांच्या वतीने धिंड काढण्यात आली. यानंतर चंपाचौक येथे त्याची धिंड काढली. पोलिसांनी तीनही आरोपींना हातकड्या घालून मुख्य रस्त्यावरुन फिरवत त्यांना लोकांची माफी मागण्यास भाग पाडले.

10 सप्टेंबर रोजी एमजीएम विद्यापीठ परिसरात गाडीचे हरण वाजवून मुलींची छेड काढतानाचे रिल बनवून सोशल मीडियावर व्हायरल करणारा इनफ्लून्सर शेख समीर शेख सलिम, राहणार गल्ली नं.19, इंदिरानगर बायजीपुरा याच्या विरोधात गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला याला अटक करण्यात आली. आज या आरोपिची एमजीएम विद्यापीठ परिसरात धिंड काढून माफी मागायला लावली. पोलिस प्रशासनाने शाळा व महाविद्यालये परिसरात कोणी अंमली पदार्थांचे सेवन करुन दारु पिऊन मुलींची छेड काढत असेल तर पोलिसांना संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow