औरंगाबादेत 250 कोटींचे अमली पदार्थ जप्त, दोन दिवसांपासून छापेमारीने खळबळ...!

 0
औरंगाबादेत 250 कोटींचे अमली पदार्थ जप्त, दोन दिवसांपासून छापेमारीने खळबळ...!

औरंगाबादेत 250 कोटींचे अमलीपदार्थ जप्त, दोन दिवसांपासून छापेमारीने खळबळ...

पैठण MIDC आणि शहरात DRDचे छापे, एका आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न...

औरंगाबाद, दि.22(डि-24 न्यूज) राज्यात अमली पदार्थामुळे राजकारण पेटलेले असताना जिल्ह्यात छापेमारीत 250 कोटींचे अमली पदार्थ जब्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

राज्यात गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणानंतर पैठण MIDC व औरंगाबादेतही छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये मेफाड्राॅन कोकेन, केटामाईन या तीन प्रकारचे 250 कोटींपेक्षा जास्त किंमत असलेले अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यातील एकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर संदीप शंकर कामावत याला अटक करण्यात आले असून त्याला पैठणच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवार पासून हि कार्यवाही सुरू होती.

संदीप कामावत याला सिडको पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्याविषयीचे केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाचे पुणे येथील अधिकारी विशाल संगवान यांनी पत्र दिल्याची माहिती सिडकोच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली. गुजरागतमधील एका गुन्ह्यातील तपासाच्या अंगाने अहमदाबादमधील केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणा (DRI), तेथील गुन्हे शाखा व पुण्यातील DRI विभागाचे पथक 20 ऑक्टोबरपासून या कारवाईसाठी शहरात दाखल झाले आहे. अमली पदार्थ बनवणारी कंपनी पैठण येथील आैद्योगिक वसाहतीमध्ये आहे. तेथील महालक्ष्मी इंडस्ट्रिजमध्ये केलेल्या छापेमारीत मेफाड्रोन व केटामाईन आढळून आले आहे. तर आरोपींच्या घराच्या परिसरातून 23 किलो कोकीन, 2.9 किलो मेफाड्रोन आणि 30 लाख रुपये रोख रुपये आढळून आले. तर पैठणच्या महालक्ष्मी इंडस्ट्रिजमध्ये मेफाड्रोन व केटामाईन अनुक्रमे 4.5 किलो व 4.3 किलो सापडले. तसेच याशिवाय मेफाड्रोन मिश्रण असलेले 9.3 किलोचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची किंमत 250 कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून देण्यात आली आहे. ही कारवाई रोहीत निगवेगकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाचे धागेदाेरे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत असू शकतील असे सांगण्यात येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow