शहरात कुकची गळा चिरून निर्घुणपणे हत्या...!
शहरात कुकची गळा चिरून निर्घुणपणे हत्या...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज)- जालना रोड सेंट फ्रान्सिस इंग्रजी शाळेच्या मैदानावर काल रात्री 10.30 च्या दरम्यान एका हाॅटेलात कुकचे काम करणारा युवक सुरेश भगवान उंबरकर,वय 24, राहणार जाफराबाद, हल्ली मुक्काम भानुदास नगर, छत्रपती संभाजीनगर याचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घुणपणे हत्या करण्यात आली.
इंग्रजी शाळेच्या मैदानावर मृतदेह पडलेला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फाॅरेन्सिक लॅबचे पथकही दाखल झाले. उशिरा रात्रीपर्यंत मृतदेह घटनास्थळी होता. पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, पोलिस निरीक्षक(गुन्हे शाखा) संभाजी पवार, कुंभार यांच्यासह मोठ्या संख्येने पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत सुरेश हा कुक म्हणून काम करत होता. हा तरुण जाफराबाद येथील रहिवासी होता. मृतांच्या नातेवाईकांना माहिती मिळताच घटनास्थळी आक्रोश केला. खुनाची माहिती मिळताच बघ्यांची गर्दी जमली होती यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला. यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. खुन कोणी व कशासाठी केला हे पोलिस तपासानंतर समोर येईल.
What's Your Reaction?