पोलिस उपनिरीक्षकांचा पतंगाच्या मांजाने गळा चिरल्याने पोलिस दलात खळबळ, पतंगबाजांवर ड्रोनची नजर

पोलिस उपनिरीक्षकांचा पतंगाच्या मांजाने गळा चिरल्याने पोलिस दलात खळबळ, पतंगबाजांवर ड्रोनची नजर
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज) आज मकर संक्रांत सन उत्साहात साजरा होत असताना सकाळी 9.30 वाजेच्या दरम्यान ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक दिपक पारधे नाईकनगरकडून जाण्यासाठी निघाले असता रेणूका कमानीजवळ पतंगाच्या मांजामुळे गळ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ सिग्मा हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मांजामुळे गळा चिरल्याने तात्काळ तेथील डॉक्टरांनी ऑपरेशन केल्याने त्यांची प्रकृती सध्या बरी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागिल एक महीन्यात पासून पोलिस दल रस्त्यावर उतरून नायलॉन मांजा वापर करु नये म्हणून शहरात जनजागृती करत आहे. मांजा आढळल्याने गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जात आहे तरीही हि घटना घडल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. हाॅस्पिटलमध्ये पोलिस आयुक्त प्रविण पवार, पोलिस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी भेट देऊन विचारपूस केली.
पारधे यांची पोलिस अधिकाऱ्यांनी भेट घेतली तब्येत ठीक असल्याचे समजते. आऊठ ऑफ डेंजर असल्याचे कळाले. पतंग उडवण्याच्या नादात अनेक दुर्घटना होत आहे यासाठी नागरिकांनी व मुलांनी रस्त्यावर चालताना काळजी घ्यावी. मांजामुळे बचाव व्हावा यासाठी वाहतूक पोलिसांकडून मोटारसायकलवर सुरक्षा तार बसवली जात आहे. नायलॉन मांजा आढळल्यास पालकांवर कारवाई केली जात आहे. मकर संक्रांतीला ड्रोनद्वारे पतंगबाजांवर नजर ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी जागोजागी कारवाई सुरू केली आहे. नागरिक व पक्षी आणि जनावरांना इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे आवाहन पोलिसांनी केले आहे
.
What's Your Reaction?






