निधन झालेल्या वडिलांचे रुग्णालयाचे बील काढण्यासाठी मागितली लाच...

निधन झालेल्या वडिलांचे रुग्णालयाचे बील काढण्यासाठी मागितली लाच...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज)
निधन झालेल्या वडीलांचे उपचाराचे बील काढण्यासाठी लिपिकाने लाचेची मागणी केली. जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय एन-12, लिपिक सोपान पंडितराव टेपले, वय 41, राहणार मयुर पार्क संभाजिनगर यांनी 20 हजाराची लाचेची मागणी केली तडजोडी अंती फोन पे वर 15 हजारांची लाच स्विकारताना लाच लुचपत विरोधी विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
तक्रारदार यांचे वडील जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय येथे होमगार्ड पदावर कार्यरत होते. त्यांचे औषध उपचारादरम्यान एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. उपचाराचे बिल, सानुग्रह अनुदान मंजूर होऊन मिळण्याकरीता महीला तक्रारदाराने कायदेशीर अर्ज केला होता. मंजुरी बाबत माहिती घेण्यासाठी महीला गेली असता 20 हजाराची लाचेची मागणी केली होती. लिपिका विरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. सदरील कार्यवाही पोलिस अधिक्षक श्रीमती माधुरी कांगणे, प्रभारी अपर पोलिस अधिक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक राजू बी.नांगलोत, सहा.सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक संतोष तिगोटे, पोह राजेंद्र सिनकर, साईनाथ तोडकर, पोअ सी.एन.बागूल यांनी केली आहे.
What's Your Reaction?






