शहरात मोठी कार्यवाई, 86 जनावरे पोलिसांच्या ताब्यात, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

औरंगाबाद: सिटीचौक पोलिसांची मोठी कारवाई : 20 लाख रुपये किमतीच्या 86 गोवंश जनावरांची सुटका
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.4
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात अवैधरीत्या गोवंश जनावरांची वाहतूक करून कत्तलीसाठी साठवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर सिटीचौक पोलिस ठाण्याच्या पथकाने आणि बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या मदतीने संयुक्त छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 86 गोवंश जनावरे ताब्यात घेण्यात आली असून त्यांची अंदाजे किंमत 20 लाख 31 हजार रुपये आहे.
पोलीस आयुक्त श्री. संदीप पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ १ मा. श्री. शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, पोलीस निरीक्षक अर्जुन कदम, उपनिरीक्षक मुठाळ, निवृत्ती गायके, विलास शिंदे, पोलीस नाईक मुनीर पठाण, साळुंके, पवार, सदावर्ते, डंबाळे, शिंदे आदींनी ही कारवाई केली.
कारवाईची हकिगत पुढीलप्रमाणे :
कारवाई क्र.1 – सिटीचौक ते किला अर्क रोडवरील नुरानी मशीदजवळील समीर शेख यांच्या जागेत आरोपी मिर्झा अनिस बेग आणि नदिम खान यांच्याकडे 17.90 लाख रुपये किमतीची एकूण 72 गोवंश जनावरे आढळून आली.
कारवाई क्र. 2 – केन्सर हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यालगत इस्तियाक बाबूमिया कुरेशी यांच्या पडक्या जागेत 85 हजार रुपये किमतीची 6 जनावरे आढळून आली.
कारवाई क्र. 3– चित्तेखाना कब्रस्तान येथे 16 हजार रुपये किमतीची 2 जनावरे आढळून आली.
कारवाई क्र. 4 – जलाल कॉलनीतील एका जागेत इस्तियाक बाबूमिया कुरेशी याच्याकडे 1.40 लाख रुपये किमतीची 6 जनावरे आढळून आली.
या जनावरांना अत्यंत कमी जागेत, क्रूरपणे दोराने बांधून ठेवण्यात आले होते व ती सामान्य नागरिकांच्या नजरेपासून लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. बकरी ईदच्या निमित्ताने त्यांच्या कत्तलीसाठी नियोजन करण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे.
याप्रकरणी मिझा अनिस बेग, नदिम खान आणि इस्तियाक कुरेशी यांच्याविरुद्ध कलम ११(१)(g) प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यावर बंदी असलेला कायदा, तसेच कलम ५(अ), ५(ब), ९ महाराष्ट्र पशु संरक्षण* अधिनियम १९७६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. तीघांविरुध्द सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
What's Your Reaction?






