चाकूचा धाक दाखवून लुटणारे 24 तासात गजाआड, ग्रामीण पोलिसांची कारवाई
 
                                चाकुचा धाक दाखवून जबरदस्तीने लुटणारे दोघे 24 तासात गजाआड तर मोटरसायकल चोरटयास शिताफिने केले जेरबंद
गंगापुर पोलीसांची कारवाई...
गंगापूर,दि.20(डि-24 न्यूज) पोलीस ठाणे गंगापुर येथे रोजी तक्रारदार दिनेश रुमर्सिंग कश्यप वय 34 वर्षे रा. पिपलीया गई, ता. सेंधवा जि. बडवाणी (मध्यप्रदेश) ह.मु. भिवधानोरा ता. गंगापुर यांनी तक्रार दिली कि, ते भिवधानोरा येथील शेतवस्तीवर शेतमजुर म्हणुन कामाला असुन 18 जानेवारी रोजी भिवधानोरा येथिल आठवडी बाजार असल्याने सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास बाजार करण्यासाठी गेलो होतो. यावेळी मालकाने त्यांचा पगार म्हणून त्यांना 20 हजार रुपये दिलेले त्यांचे जवळच होते. रात्री 8 वाजेच्या सुमारास बराच अंधार झालेला असल्याने बाजार करून शेतवस्तीवर परत जात असतांना भिवधानोरा गावाचे अलिकडे दोन व्यक्ती भरधाव वेगात माझ्याजवळ आले व माझ्या हाताला धरून मला बळजबरीने ओढत शेतात नेले, मी बराच आरडा ओरड करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या व्यक्तींनी त्याच्या जवळ असलेला चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देवून बाजार करून उरलेले माझ्या खिशातील 15 हजार रूपये रोख व मोबाईल फोन असा एकुण 26 हजार रुपये किंमतीचा माल बळजबरीने चोरून नेला. या तक्रारीवरून पोलीस ठाणे गंगापुर येथे रोजी कलम 394 भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांचे सुचना नुसार नमुद गुन्हयाचा तपास पोनि सत्यजीत ताईतवाले हे करीत असतांना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली कि नमुद गुन्हा हा भिवधानोरा व परखोरा येथील राहणारे दोन व्यक्तींनी केला आहे. यावरुन गंगापुर पोलीसांची दोन वेगवेगळी पथके तयार करून पो.नि. ताईतवाले यांचे पथकांने पखोरा येथील शेतवस्तीवर संशयीत ईसमाचा शोध घेतला असता तो एका पडित गायरान जमिनीतील झाडाचे आडोशाला लपून बसला होता. पोलीसांनी शेताच्या परिसरात सापळा लावून अत्यंत शिताफिने हालचाल न होवू देता आरोपी हा गाफिल असतांना त्याचेवर अचानक झडप घालून त्याला ताब्यात घेतले यावेळी त्याला त्याचे नाव गाव विचारता त्यांने त्याचे नाव सागर अशोक जाधव वय 22 वर्षे रा. पाखोरा ता. गंगापुर असे सांगितले. यावेळी त्याला गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस करता तो पोलीसांना उडवा उडवीचे उत्तरे देवून लागल्याने त्याचेवर अधिक संशय बळावल्याने त्यास विश्वासात घेवुन विचारपूस करता त्यांन सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार नामे रामेश्वर बाळासाहेब चव्हाण यांचे सोबतीने केल्याचे कबुल केले. यावरून लगेच श्री प्रमोद काळे, पोउपनि यांचे पथकांने मिळालेल्या माहितीच्या आधारे भिवधानोरा येथील स्मशान भुमीच्या परिसरात लपून बसलेल्या दुसरा आरोपीच्या अत्यंत शिताफिने मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केले आहे. त्यांचे ताब्यातुन गुन्हयातील तीन हजार रुपये रोख व मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व नमुद गुन्हयात सागर अशोक जाधव वय 22 वर्षे रा. पाखोरा ता. गंगापुर, रामेश्वर बाळासाहेब चव्हाण वय 30 वर्षे रा. भिवधानोरा यांना अटक करण्यात आली आहे.
याचप्रमाणे पोनि, सत्यजीत ताईतवाले हे परतोरा येथील आरोपीला पो.स्टे. गंगापुर येथे घेवुन जात असतांना मोटरसायकल वरिल एक इसम हा पोलीसांना बघुन अत्यंत भरधाव वेगात सुसाट निघाला यावेळी त्याचेवर संशय बळावल्याने त्याचा 1 किमी पेक्षा अधिक पाठलाग करून त्यास पखोरा येथील पारधी वस्तीजवळ थांबवून विचारपुस करता तो पोलीसांना घाबरुन उडवा-उडवीचे उत्तरे देवु लागल्याने त्याची कसोशिने विचारपुस करता त्यांने त्याचे नाव सुरेश वाल्मिक घाणे वय 23 वर्षे रा. शहापुर घोडेगाव असे सांगुन तो चालवित असलेली मोटरसायकल स्प्लेंडर प्लस काळया रंगाची क्रमांक MH-20, DP-7404 ही त्याने बकलवालनगर, वाळूज, येथुन दिनांक 7/5/2020 रोजी चोरी केल्याचे कबुल केले आहे. यावरून गंगापूर पोलीसांचे सतर्कतेमुळे पो.स्टे. वाळूज, येथील गुरनं 107/2020 कलम 379 भादंवी हा सुध्दा उघडकीस आणला असून नमुद गुन्हयातील चोरी गेलेली मोटरसायकल स्प्लेंडर प्लस क्रमांक MH-20, DP-7404 ही जप्त करण्यात आरोपी सुरेश वाल्मिक घाणे वय 27 वर्षे रा. शहापुर घोडेगाव यास नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
हि कारवाई पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, चार्ज गंगापुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, पोउनि प्रमोद काळे, पोलीस अंमलदार संदीप राठोड, राहुल वडमारे, संदीप गायकवाड, अजित नागलोद यांनी केली आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            