किराडपूरा राममंदिर परिसरात अनधिकृत वाहनधारकांविरुध्द कारवाई
किराडपूरा येथील राम मंदिर परिसरात अनधिकृत वाहनधारकाविरुद्ध कारवाई
औरंगाबाद, दि.20(डि-24 न्यूज) महानगरपालिका आणि शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आज राम मंदिर परिसरातील रस्त्यावर व मंदिर परिसरातील उभे असलेल्या अनधिकृत चारचाकी व दुचाकी रिक्षा असे वाहनधारकाविरुद्ध सकाळी कारवाई करण्यात आली.
यामध्ये एकूण दहा वाहनधारका विरुद्ध कारवाई करून त्यापैकी दोन गाड्या जप्त करण्यात आल्या व इतर वाहनांना ऑनलाइन व जाय मोक्यावर दंड लावण्यात आला.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार तसेच या भागातील नागरिकांच्या मागणीनुसार महानगरपालिकडे आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने व 22 तारखेला राम मंदिर परिसरात असलेल्या कार्यक्रमासाठी ही मोहीम घेण्यात आली.
या मोहिमेचे या भागातील सर्वच नागरिकांनी स्वागत केले. महानगरपालिकेने आझाद चौक ते राम मंदिर किराडपुरा ते रोशन गेट असा सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार केला परंतु काही नागरिक हे त्यांच्या चार चाकी, दोचाकी, रिक्षा, लोडिंग व इतर भंगार गाड्या मंदिर परिसरातील रोडवर पार्क करत होते. याबाबत महानगरपालिका झोन क्रमांक तीनच्या वतीने वेळोवेळी या नागरिकांना सूचित करण्यात आले होते.
उभे वाहनांमुळे याठिकाणी कचरा देखील साचत होता. याशिवाय पार्किंग वरून आणि रस्ता अरुंद झाल्याकरणाने भांडणा देखील व्हायची.
याबाबत स्थानिक नागरिकांनी प्रशासक जी श्रीकांत यांना व्हाट्सअप द्वारे, फोन द्वारे माहिती दिली त्यानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आज या भागात सकाळी मोहीम सुरू केली असता या मोहिमेत एकूण दहा हजार रुपये दंड लावण्यात आला व दोन गाड्या जप्त करण्यात आली.
याच कारवाईत डिव्हायडरवर ठेवण्यात आलेले जुने वॉशिंग मशीन, फ्रीज तीन पत्रे, लाकडी गाडी व लाकडी बल्या इत्यादी साहित्य जबत करण्यात आल्या. व तो परिसर स्वच्छ करण्यात आला.
सदरील कारवाई सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांच्या विभागाचे पोलीस निरीक्षक अमोल देवकर, उप आयुक्त मंगेश देवरे, झोन ऑफिसर नईम अन्सारी, अतिक्रमण निरीक्षक युनूस शेख, सय्यद जमशेद व वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी जीन्सी पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी पार पाडली.
What's Your Reaction?