पूर्व रंगचे थाटात उद्घाटन, वेरुळ -अजिंठा इंटरनॅशनल महोत्सवाची तिकीट विक्री सुरू...!

पूर्व रंगचे थाटात उद्घाटन, वेरुळ-अजिंठा इंटरनॅशनल महोत्सवाची तिकीट विक्री सुरू...
औरंगाबाद,दि.20(डि-24 न्यूज) पूर्व रंगचे थाटात उद्घाटन आज उद्घाटन करण्यात आले. वेरुळ -अजिंठा इंटरनॅशनल महोत्सवाचे तिकीट विक्री सुरू झाली आहे. तिकीट दर 1500 रुपये, 900, 600 रुपये असणार आहे.
आज पूर्व रंग कार्यक्रमात अनुभूती ( कथ्थक ) निधी प्रभू आणि सहकारी, शाहीर रामानंद उगले यांनी महाराष्ट्राची लोकगाणी सादर केली आणि यानंतर प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या लोकोत्सव कार्यक्रम सादर केला यामध्ये रेश्मा परीतेकर यांची लावणी आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते पांडुरंग घोटकर यांच सादरीकरण झालं.
प्रारंभी पूर्वरंगचे उद्घाटन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, लोकसेवा आयुक्त दिलीप शिंदे, महापालिका प्रशासक, आयुक्त जी. श्रीकांत, पर्यटन उपसंचालक विजय जाधव, महोत्सव समन्वयक अनिल इरावणे, सारंग टाकळकर, स्मिता हॉलिडेचे जयंत गोरे, किरण देशपांडे यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निता पानसरे यांनी केले.
What's Your Reaction?






