महानगरपालिकेचे विद्यार्थी आकाशवाणीवर झळकणार...!

महानगरपालिकेचे विद्यार्थी आकाशवाणीवर झळकणार...
औरंगाबाद, दि.15(डि-24 न्यूज) केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय हर्सूलगाव या शाळेतील विद्यार्थी दि. 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी असे आपली मायबोली हा कार्यक्रम आकाशवाणी केंद्रावर सादर होणार आहे. या कार्यक्रमात महानगरपालिकेचे विद्यार्थी आपले कलागुण सादर करणार आहेत. रविवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजून 35 मिनिटांनी आकाशवाणी केंद्रावर , एफएम 101.7 यावर तसेच संपूर्ण राज्यात त्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या प्रेरणेतून मनपाचे विद्यार्थी आता आकाशवाणीवर झळकणार आहेत. या कार्यक्रमासाठी उपायुक्त नंदा गायकवाड व शिक्षणाधिकारी , भारत तिनगोटे मुख्याध्यापक उर्मिला लोहार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले असून कार्यक्रमाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन मनपा हर्सूल शाळेतील शिक्षक संजय कुलकर्णी यांचे आहे. कार्यक्रमात आर्यन राजगुरे, सुयश ढगे, सृष्टी गौतम, यशोदा खेत्रे, आणि रेणुका वाघ यांनी सहभाग घेतला आहे . कार्यक्रम सर्व विद्यार्थी पालक आणि सर्व नागरिक यांनी ऐकावा असे आवाहन मनपा शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
What's Your Reaction?






