फेब्रुवारीत वेरुळ -अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन, जिल्हाधिकारी यांची माहिती
जगविख्यात वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव 2,3,4 फेब्रुवारीला ऐतिहासिक सोनेरी महालात...
जागतिक दर्जाच्या सुप्रसिद्ध कलाकाराच्या शास्त्रीय गायन ,नृत्य , कला,वादनाचा अविष्कार-जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय...
औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज) पर्यटन वाढीसाठी जागतिक स्तरावर जिल्हयाची ओळख प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालय सातत्याने प्रयत्न करते. विविध सेमीनार, परिषदा इ. चे आयोजन करुन अधिकाधिक पर्यटक येतील यासाठी प्रयत्न करत आहे. जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने 1985 पासुन वेरुळ येथील कैलास लेणी समोरील जागेमध्ये जगविख्यात वेरूळ महोत्सवाची सुरूवात केली होती. सदर महोत्सवाचे रूपांतर 2002 पासुन वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात करण्यात आले. सदर महोत्सव जिल्हा प्रशासन, संयोजन समीती व पर्यटन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यामाने करण्यात येतो. प्रतिवर्षी प्रमाणे सन 2016 साली वेरूळ - अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मागच्या काही काळात विविध कारणामुळे हा महोत्सव होऊ शकला नव्हता. याच वर्षी म्हणजे फेब्रुवारी 2023 मध्ये 7 वर्षानंतर अजिंठा- वेरूळ महोत्सव 2023 घेण्यात आला. त्याच प्रमाणे या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये 2, 3 व 4 फेब्रुवारी 2024 या कालावधी मध्ये महोत्सव घेण्याचे निश्चित केले असून दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महोत्सव होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे मुख्य सल्लागार दिलीप शिंदे, महानगरपालिका आयुक्त श्रीकांत, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक ग्रामीण मनीष कलवानिया, महत्व समितीचे सचिव विजय जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार म्हणाले की ,वेरूळ -अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवा निमित्त पर्यटनाला चालना देण्याची व भारतीय अभिजात कला, नृत्य, साहित्य-संस्कृती यांच्या प्रचाराची मोठी संधी मिळाली आहे. या वर्षी दि. 2, 3 व 4 फेब्रुवारी 2024 रोजी सोनेरी महाल येथे जागतिक दर्जाच्या सुप्रसिध्द कलाकारांमार्फत शास्त्रीय व उपशास्रीय, गायन, वादन व शास्त्रीय नृत्य इ. सादर केले जाणार आहे. सदर महोत्सवामध्ये श्रीमती संध्या पुरेचा व चमु, श्रीमती अनुराधा पाल व चमु, राहुल देशपांडे, प्रियंका बर्वे, अमान व अयान, कैलाश खेर तसेच वैदेही परशूरामी, उर्मिला कानेटकर- कोठारी, श्रेया घोषाल व इतर कलाकार कला सादर करणार आहेत.
पूर्वरंग...
वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाची घोषणा करणारा पूर्वरंग कार्यक्रमाचे आयोजन यानिमित्त करण्यात आले असून 20 व 21 जानेवारी 2024 शनिवार व रविवारी सायंकाळी हा कार्यक्रम होत आहे. संत एकनाथ रंगमंदिर येथे होत असलेल्या या कार्यक्रमात विविध कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे.
महोत्सवाची घोषणा करणारा पूर्वरंग, शनिवार 20 जानेवारी 2024 ,सांय 6.00 उदघाटन सोहळा.
सांय 7.00 ते 07.40 वा. “अनुभूती” कथ्थक नृत्य श्रीमती निधी प्रभु व सहकारी
रात्री 07.40 ते 08.20 वा. “महाराष्ट्राची लोकगाणी” शाहीर रामानंद उगले
रात्री 8.30 ते 10.00 वा.”लोकोत्सव” प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे सह लावणी सम्राज्ञी रेश्मा परितेकर, प्रमिला लोदगेकर व ढोलकी सम्राट पाडुंरंग घोटकर, कृष्णा मुसळे
रविवार दिनांक 21 जानेवारी 2024
सांय 06.45 वा. तबला वादन सई बारबोटे
सांय 07.00 ते 07.30 वा. सतार वादर डॉ. स्विकार कटटी
रात्री 07.30 ते 10.00 वा. अविनाश विश्वजीत लाईव्ह इन कॉन्सर्ट
सोबत रोहित राऊत, मधुरा कुंभार, दिप्ती भागवत व रवींद्र खोमणे
मान्यवरांच्या हस्ते शनिवारी होणार उद्घाटन !...
पूर्वरंग हा वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाची नांदी असलेला पूर्वरंग कार्यक्रमाने महोत्सवाला सुरुवात होईल. याचे उद्घाटन शनिवारी दिनांक 20 जानेवारी रोजी सायंकाळी 6.00 वाजता होणार आहे. रावसाहेब दानवे ( केंद्रीय राज्यमंत्री - रेल्वे, कोळसा व खाण, भारत सरकार) आणि . डॉ. भागवत कराड ( केंद्रीय राज्यमंत्री वित्त, भारत सरकार) यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून संदीपान भुमरे ( पालकमंत्री तथा रोहयो व फलोत्पादन मंत्री महाराष्ट्र ) यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. अब्दुल सत्तार ( कृषी मंत्री महाराष्ट्र) , अतुल सावे ( सहकार व पणन, तथा सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र) हे कार्यक्रमाचे सह अध्यक्ष असतील. प्रमुख पाहुणे - अंबादास दानवे ( विरोधी पक्ष नेता विधान परिषद),
विशेष उपस्थिती खा. इम्तियाज जलील, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे,हरिभाऊ बागडे, आ. संजय शिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल, आ. प्रशांत बंब, आ. उदयसिंग राजपूत, आ. रमेश बोरनारे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणुन दिलीप शिंदे भा.प्र.से. राज्य आयुक्त, लोकसेवा हक्क आयोग, पुणे हे असणार आहेत. विशेष निमंत्रित म्हणून विभागीय आयुक्त मधुकर अर्दड, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, अधीक्षक लोहमार्ग श्रीमती मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक एस आर पी एफ निमित्त गोयल, सह आयुक्त विक्रीकर मिलिंद कुमार साळवे, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
पूर्वरंग उद्घाटन समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन आस्तिक कुमार पाण्डेय जिल्हाधिकारी, तथा अध्यक्ष, वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजन समिती, जी. श्रीकांत भा.प्र.से. आयुक्त, महानगरपालिका आयुक्त तथा सहअध्यक्ष, वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव समीती तसेच वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजन समिती-2024 यांनी केले आहे.
महोत्सवानिमित्त पूरक कार्यक्रमांची रेलचेल !
वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवानिमित्त यंदा शहरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये गायन वादन सादरीकरण यांचा समावेश करण्यात आला आहे. " पूर्वरंग " कार्यक्रमानंतर हे कार्यक्रम होतील. यामध्ये 23 जानेवारी 2024 रोजी कॅनाट प्लेस येथे 25 जानेवारी 2024 रोजी क्रांती चौकात तसेच 28 जानेवारी 2024 रोजी छावनी येथे लोककलांचे सादरीकरण होईल.
मंगळवार 23 जानेवारी 2024
स्थळ:- कॅनाट प्लेस सिडको
सांय.06.00 ते 10.00 वा. खयाल ए बंदिश
एम 4 फ्युजन रॉक बँड विथ सुफी
सागर म्हात्रे, कैवल्य केजकर, महेश बधे,चंद्रकांत उनावने च ओंकार इंगावले
गुरूवार 25 जानेवारी 2024
स्थळ:- क्रांती चौक (झांशीची राणी पुतळा)
सांय 06.00 वा. पर्यटनाची जागर ज्योत
प्रजाकसत्ताक दिन पूर्वसंध्या व पर्यटन दिनानिमित्त विशेष आयोजन
उपस्थिती प्रख्यात अभिनेत्री जुई गडकरी
रविवार 28 जानेवारी 2024
स्थळ:- छावनी (कॅन्टान्मेंट परिसर)
सांय 06.00 ते 10.00 वा. देश मेरा रंगीला
देशभक्ती – हिंदी मराठी गीते-नृत्य
सुत्रसंचालन:- दिप्ती भागवत (अभिनेत्री), आर जे प्रेषित रुद्रवार,
नीता पाणसरे व किरण देशपांडे
उपरोक्त प्रमाणे पुर्वरंग कार्यक्रमाची सुरूवात दिनांक 20 जानेवारी 2024 पासुन सुरू होवुन दिनांक 28 जानेवारी 2024 पर्यंत असणार आहे. या सर्व कार्यक्रमाचे लाभ शहर वासीयांनी घ्यावे असे मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय समीती-2024 तसेच अध्यक्ष, वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय आयोजन समीती-2024 च्या वतीने करण्यात येत आहे. सर्व कार्यक्रम हे निशुल्क असणार आहेत.
त्यानुषंगाने वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव हा दिनांक 2 फेब्रुवारी 2024 ते 4 फेब्रुवारी 2024 रोजी सोनेरी महाल,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर येथे होत आहे. सदर महोत्सवाचा लाभ जास्तीत जास्त शहर वासीयांनी घ्यावे.
कार्यक्रमाची रुपरेषा...
शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024
सांय 07.00 ते 08.00 वा. डॉ. संध्या पुरेचा व चमु यांचे भरतनाट्यम् नृत्य
रात्री 08.00 ते 09.00 वा. अनुराधा पाल व चमु यांचे वादन
रात्री 09.00 ते 11.00 राहूल देशपांडे व प्रियंका बर्वे यांचे शास्रिय/ उपशास्त्रिय गायन
शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी 2024
सांय 07.00 ते 08.00 वा. श्री. अमान व अयान यांचे सरोद वादन
रात्री 08.00 ते 10.00 वा. श्री. कैलाश खेर व चमू यांचे सुफी सादरीकरण
रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2024
सांय 07.00 ते 07.45 वा. श्रीमती वैदेही परशुरामी व उर्मीला कानेटकर- कोठारी यांचे
कथ्थक
रात्री 08.00 ते 10.30 वा. श्रीमती श्रेया घोषाल व चमु यांचे सादरीकरण
उपरोक्त प्रमाणे यावर्षीच्या वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या कार्यक्रमाची रुपरेषा असणार आहे. सदर कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री दोन्ही व. पर्यटन मंत्री तसेच प्रधान सचिव यांना या कार्यक्रमाच्या उदघाटनासाठी विनंती करण्यात येत आहे.
दिनांक 20 जानेवारी 2024 पासुन सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा समारोप तसेच या महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी अधिकारी,कर्मचारी, पदाधिकारी तसेच आयोजन समीत्यांचे सदस्य व नियोजनामध्ये ज्यांचे सहकार्य लागले अश्या सर्वांचा सत्कार समारंभ कार्यक्रम म्हणुन उत्तररंग हा कार्यक्रम दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी संत एकनाथ रंगमंदिर येथे आयोजित करण्यात येणार आहे.
शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी 2024
सांय 7.00 ते 9.30 वा. पं. विजय घाटे यांचे ताल दिंडी व ममता जोशी यांचा सुफीचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव समितीचे अध्यक्ष आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली.
What's Your Reaction?