नायलॉनचा मांजा विक्री करणाऱ्या दुकानावर फिरणार बुलडोझर, मनपा प्रशासक जी.श्रीकांत यांचा कडक इशारा
नायलॉनचा मांजा विक्री करणाऱ्या दुकानावर फिरणार बुलडोझर, मनपा प्रशासक जी.श्रीकांत यांचा कडक इशारा
औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज) शहरात पतंग विक्रेते छुप्या पद्धतीने नायलॉनच्या मांजाची विक्री करत आहे. पोलिस प्रशासनाच्या वतीने हा मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. आता या कार्यवाहीत मनपा प्रशासनाने कडक भुमिका घेतली आहे. जे पतंग विक्रेते नायलॉन मांजा विक्री करताना आढळून आले तर त्यांच्या अनधिकृत दुकानांवर मनपाचा बुलडोझर फिरणार असल्याचा कडक इशारा मनपा आयुक्त तथा प्रशासक जी.श्रीकांत यांनी दिला आहे.
पतंग उडवताना वाहनधारक गाडी चालवत असताना त्यांना इजा होण्याचे घटना घडत आहे. न्यायालयाने सुध्दा मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस प्रशासन व महापालिका कार्यवाही करुन दंडात्मक कारवाई करत आहे. दुकानदार प्रशासनाला जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.
मकर संक्रांत सनाला काही दिवस उरले असताना पतंग बाजी वाढणार आहे याकडे प्रशासनाचे अधिक लक्ष असणार आहे. तरी पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर करु नये असे आवाहन करण्यात येत आहे. न्यायालयाने नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी व विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. यामुळे महापालिकेच्या वतीने पतंगाच्या दुकानांवर धाड टाकून कार्यवाही सुरू केली आहे. नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानावर दंडात्मक कारवाई करत दुकाने मनपाच्या नागरी पथकाकडून सिल केले जात आहे. मुलांनी पतंग उडवताना नायलॉन मांजा वापर करु नये. आझाद चौक येथे मुजफ्फर सय्यद यास मांजामुळे इजा झाल्याने पाच टाके द्यावे लागले. अशा आणखी दोन घटनेत मांजामुळे दोन जणांना जखम झाली आहे. पालकांना त्यांनी आवाहन केले आपल्या मुलांकडून पतंगबाजीमुळे कोणाला इजा होऊ नये याकडे लक्ष द्यावे यामुळे कोणाचा जीव जाऊ शकतो असे जी.श्रीकांत यांनी म्हटले आहे.
What's Your Reaction?