विनोद पाटील यांची अखेर लोकसभा निवडणुकीतून माघार

 0
विनोद पाटील यांची अखेर लोकसभा निवडणुकीतून माघार

विनोद पाटील यांचे प्रयत्न निष्फळ, निवडणुकीतून माघार

औरंगाबाद, दि.24(डि-24 न्यूज) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महायुतीची उमेदवारी मिळावी लोकसभा निवडणूक जिंकण्याचे गणित माझ्याकडे आहे. असे सांगितले होते. दोन्ही नेते पण उमेदवारी देण्यासाठी तयार होते असे असताना उमेदवारीला दोन आमदार व एका राज्यसभा सदस्याने विरोध केला होता. अपक्ष निवडणूक लढलो असतो जिंकलोही असतो पण ताकत कमी पडली असती यामुळे कोणी उमेदवार पडला तर डाग लागला असता म्हणून सर्वांची माफी मागून निवडणूकीतून माघार घेत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे.

त्यांनी सांगितले जिल्ह्यातील सर्व जाती धर्मातील लोकांनी आग्रह केला होता निवडून आणू परंतु उमेदवारी मिळाली नाही. अपक्ष उमेदवार अर्ज भरला निवडूनही येऊ परंतु ताकत कमी पडली कोणी एका पक्षाचा उमेदवार पडला तर कलंक लागेल म्हणून कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा न देता प्रचार करणार नाही. तटस्थ राहणार आहे. जनतेच्या समोर नाक रगडतो नतमस्तक होतो या निवडणुकीत उभे राहणार नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील प्रश्नांची जाण आहे शेतकरी, युवा, महीलांचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी आंदोलन करावी लागली तरी करणार. कोणत्या उमेदवाराला मत द्यायचे सांगणार नाही असे त्यांनी म्हटले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow