इम्तियाज जलील यांचे शक्तिप्रदर्शन, सर्व जाती धर्मातील लोकांची उपस्थिती, ढोल ताशांच्या गजरात डिजेवर थिरकली तरुणाई

 0
इम्तियाज जलील यांचे शक्तिप्रदर्शन, सर्व जाती धर्मातील लोकांची उपस्थिती, ढोल ताशांच्या गजरात डिजेवर थिरकली तरुणाई

इम्तियाज जलील यांचे शक्तिप्रदर्शन, सर्व जाती धर्मातील लोकांची उपस्थिती, ढोल ताशांचे गजरात, डिजेवर थिरकली तरुणाई

मिरवणूक मार्गाच्या आजूबाजूच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती... जिल्ह्यातील आदर्श पतसंस्थेतील घोटाळ्यात पैसे अडकलेले गुंतवणूकदार मोठ्या संख्येने सहभागी झाले...

औरंगाबाद, दि.24(डि-24 न्यूज) एमआयएमचे उमेदवार खासदार इम्तियाज जलील यांनी आज शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी सर्व जाती धर्मातील लोकांनी भगवे, हिरवे, निळे झेंडे हातात घेऊन मोठ्या उत्साहात सहभागी झाले. भडकलगेट येथे बारा वाजेच्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून इम्तियाज जलील यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मिरवणुकीस सुरुवात केली.

मिरवणुकीत एमआयएमच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात "मी इम्तियाज जलील " लिहिलेल्या टोप्या तीनही रंगाचे, गळ्यात एमआयएमचे भगवे, हिरवे, निळे रुमाल घालून ढोल ताशांच्या गजरात डिजेच्या तालावर तरुणाई थिरकत होते. हातात पतंगाचे फलके त्यावर इम्तियाज जलील यांचे छायाचित्र होते. इम्तियाज जलील हे सुद्धा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मराठी गाण्यांवर थिरकले. जागोजागी फटाक्यांची आतिषबाजी केली. ओपन गाडीत इम्तियाज जलील, बिलाल जलिल, जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, अरुण बोर्डे मतदारांकडून हात उंचावून आशिर्वाद मागत होते. जागोजागी इम्तियाज जलील यांच्या गाडीवर पुष्पवृष्टी केली जात होती तर लोकांनी सत्कार केला. 

मिरवणूक भडकलगेट, जुना बाजार, सिटी चौक, शहागंज, गांधी पुतळा मार्गे चेलिपूरा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचली. मिरवणुकीत महीला, पुरुष, युवा, वृध्द तापत्या उन्हात इम्तियाज जलील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी घोषणा देत पोलिस बंदोबस्तात मिरवणूक पुढे जात होती. दुपारी अडीच वाजता इम्तियाज जलील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर त्यांनी जनतेला संबोधित केले. माध्यमांना त्यांनी माहिती देताना सांगितले की मिरवणुकीत सर्व जाती धर्मातील लोक सर्व प्रकारचे झेंडे हातात घेऊन सहभागी झाले. मिरवणुकीत जनतेचा उत्साह व प्रतिसाद बघून मीच निवडून येणार दुसरा कोणी नाही असा दावा इम्तियाज जलील यांनी केला. ते म्हणाले काम करणाऱ्या उमेदवाराच्या मागे मतदार उभे राहतात असे चित्र आज दिसून आले आहे. पाच वर्षांत मी जे काम केले त्याची पावती 13 मे रोजी मला मतदार देतील मला पूर्ण आत्मविश्वास आहे मीच निवडून येणार असे जलिल यांनी सांगितले. 

 यावेळी जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर, माजी नगरसेवक नासेर सिद्दीकी, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, मा.नगरसेवक अयूब जहागिरदार, अरुण बोर्डे, जमीर अहेमद कादरी, फेरोज खान, आरेफ हुसेनी, अब्दुल अजीम, रफीक पालोदकर, युवा जिल्हाध्यक्ष मुनशी पटेल, युवा शहराध्यक्ष मो.असरार, वाजिद जहागिरदार, अजहर पठाण, महीला जिल्हाध्यक्ष फिरदौस फातेमा रमजानी खान, शहराध्यक्ष मोनिका मोरे, प्रांतोष वाघमारे, आसिफ पटेल व हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित हो

ते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow