नामांतरावरावर सोमवारी सुनावणी, आज या प्रकरणावर झाली नाही सुनावणी...!

नामांतरावरावर सोमवारी सुनावणी, आज या प्रकरणावर झाली नाही सुनावणी...!
मुंबई, दि.27(डि-24 न्यूज)
आज औरंगाबाद व उस्मानाबाद नामांतरावरावर उच्च न्यायालयात सुनावणी होती परंतु अन्य एका प्रकरणात सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला असल्याने नामांतरावरावर सोमवारी, 30 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती डि-24 न्यूजला याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांनी दिली आहे.
औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचे धाराशिव करण्याचा निर्णय घेतला असल्याने उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे.
औरंगाबाद विभाग, जिल्हा, तालुका व गाव या नामांतरावरावर सुनावणी झाली आहे निर्णय उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. सध्या औरंगाबाद व उस्मानाबाद शहराच्या नामांतरावरावर सुनावणी सुरू आहे. आज न झालेली सुनावणी सोमवारी होणार आहे. सुनावणी संपल्यानंतर निर्णय येण्याची शक्यता आहे. निर्णय लवकर यावे याकडे देशाचे व राज्याचे लक्ष लागले आहे.
यावेळी आज याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी, त्यांचे वकील एड एस,एस.काझी, त्यांचे असि.वकील शेख मोईन, मुख्य याचिकाकर्ते मुश्ताक अहमद, त्यांचे वकील एड युसुफ मुशाला, उस्मानाबाद येथील याचिकाकर्ते सुनावणीसाठी हजर झाले होते.
What's Your Reaction?






