नासेर सिद्दीकी एमआयएमचे नवीन शहराध्यक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह...!
नासेर सिद्दीकी एमआयएमचे नवीन शहराध्यक्ष, कार्यकर्त्यांचा सोशलमिडीयावर शुभेच्छांचा वर्षाव...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज) - एमआयएमचे नेते नासेर सिद्दीकी यांना पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष पदाची नवीन जवाबदारी पक्षाचे सर्वेसर्वा बॅ.तथा खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी दिली आहे. अशी माहिती सोशलमिडीया अकाऊंटवर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पोस्ट करुन दिली आहे.
नासेर सिद्दीकी यांच्याकडे अनुभव व संघटन कौशल्य असल्याने पक्षाने संधी दिली आहे. महापालिकेत अगोदर गटनेते, त्यानंतर दोनदा औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून त्यांना पक्षाने तिकीट दिले होते. महापालिका निवडणुकीत तिकीटे वाटपावरून ते नाराज होते. त्यांनी निवडणुकीत पक्षाचा प्रचार पण केला होता परंतु पक्षाने त्यांना आज शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याने पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी त्यांच्या गणेश काॅलनी येथील कार्यालयात शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. पक्षाचे शहरात एमआयएमचे 33 नगरसेवक व तीन स्विकृत सदस्य आहेत.
What's Your Reaction?