288 जागेसाठी इच्छूक उमेदवारांकडून काँग्रेसने मागवले अर्ज, शहरात सुरुवात
288 जागेसाठी इच्छूक उमेदवारांकडून काँग्रेसने मागवले अर्ज, शहरात सुरुवात, पहिल्याच दिवशी दोन इच्छूकांनी घेतला अर्ज... राज्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष एक नंबर पक्ष म्हणून उदयास आला...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.6(डि-24 न्यूज) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने सुरू केली निवडणुकीची तयारी. आजपासून शहरातील तीन विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाचे कार्यालय गांधी भवन येथून इच्छुकांना अर्जाचे वाटप सुरू केले आहे अशी माहिती डि-24 न्यूजला शहराध्यक्ष युसुफ शेख यांनी दिली आहे.
सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारांना 20 हजार रुपये तर महीलांना व इतर प्रवर्गासाठी 10 हजार रुपये भरणे अनिवार्य आहे.
सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत अर्ज घेता येणार आहे स्विकृतीही याच वेळी होणार आहे. 10 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे.
वरिष्ठ नेत्यांनी हे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शहरातील इच्छूकांसाठी अर्ज मागवले आहेत. यातून एकूण इच्छूकांची संख्या समजणार आहे. अंतिम उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय पक्षश्रेष्ठी सर्वानुमते निर्णय घेणार आहे असे शेख युसूफ यांनी सांगितले.
राजू शिंदे यांनी औरंगाबाद पश्चिम विधानसभा निवडणुकीत उतरण्यासाठी भाजपाच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याने काँग्रेस कडून सुध्दा इच्छूकांची संख्या वाढत आहे. औरंगाबाद पूर्व व औरंगाबाद मध्य साठी सुद्धा अनेक नेते इच्छुक आहेत. आज पहील्या दिवशी दोन जणांनी अर्ज घेतले. उद्यापासून इच्छूकांची गर्दी गांधी भवनात दिसून येण्याची शक्यता आहे. 13 खासदार काँग्रेसचे निवडणूक आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. महाविकास आघाडीचा काँग्रेस घटकपक्ष आहे. आणि काँग्रेसने सर्व 288 जागेवर इच्छूकांचे अर्ज मागवले. काँग्रेस स्वबळाची तयारी तर करत नाही ना अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. उद्या शहरात उध्दव ठाकरे यांचा दौरा आहे. ते विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असे बोलले जात आहे मग एकीकडे काँग्रेसनेही तयारी सुरू केली. शहरातील तीन मतदारसंघात महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला जागा सुटते हे बघावे लागेल. काँग्रेसने सर्वच जागेवर इच्छूकांचा फाॅर्मुला सुरू केला आहे यावरून दिसून येत आहे. इच्छुकांना शुल्क शहराध्यक्ष यांच्याकडे जमा करायचे आहे त्यानंतर वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेणार आहे.
What's Your Reaction?