इम्तियाज जलील नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत उभे राहण्याची शक्यता...?
इम्तियाज जलील नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत उभे राहण्याची शक्यता...?
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज) नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अकाली निधनाने या जागेवर पोटनिवडणुक घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रविंद्र चव्हाण यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. भाजपाने अजून उमेदवार निश्चित केला नाही. या निवडणुकीत एमआयएम उडी घेण्याची शक्यता आहे. इम्तियाज जलील हे या मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. त्यांनी सुध्दा यास दुजोरा दिला आहे. पक्षाचे अध्यक्ष बॅ.असदोद्दीन ओवेसींनी आदेश दिले तर निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. औरंगाबाद येथून काही दिवस अगोदर इम्तियाज जलील हे विधानसभेचे उमेदवार असतील अशी घोषणा ओवेसींनी केली होती त्यानंतर जलील यांनी तयारी सुरू केली असता हि बातमी आली आहे. त्यांनी सांगितले नांदेड येथूनच एमआयएमने महाराष्ट्रात इंट्री केली होती तेथे एमआयएमचे काम आहे म्हणून पोटनिवडणुकीत उभे राहण्याची शक्यता आहे असे त्यांनी सांगितले. दोन्ही ठिकाणी ते निवडणूक लढणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
What's Your Reaction?