राष्ट्रवादी अजित पवारांची, शरद पवारांना धक्का, क्रांतीचौकात कार्यकर्त्यांचा जल्लोष
राष्ट्रवादी अजित पवारांची, शरद पवारांना धक्का, क्रांतीचौकात कार्यकर्त्यांचा जल्लोष
औरंगाबाद, दि.6(डि-24 न्यूज) राष्ट्रवादी अजित पवारांची असा निर्णय आज निवडणूक आयोगाने देत पक्षाचे नाव व घड्याळ चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. यामुळे शरद पवार यांना धक्का बसला आहे. हि बातमी कळाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी क्रांतीचौकात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला आणि आनंद व्यक्त केला.
यावेळी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, शहरआध्यक्ष अभिजित देशमुख, सुनील मगरे, कार्याध्यक्ष कय्यूम अहेमद, युवकचे अध्यक्ष डॉ.मयूर सोनवणे, पूर्वचे अध्यक्ष नागेश भालेराव, विनोद जाधव, अल्पसंख्याक आघाडीचे असद पटेल, अयान पटेल, शेख अन्वर, शेख रफीक भाईजी, शुभम साळवे, मिलिंद जमधडे व कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?