मुक्त संचारसाठी दोन वाघ पिंजऱ्याच्या बाहेर...!
कान्हा व विक्रम मुक्त संचार करिता मोकळ्या पिंजऱ्यात...
सहा महिन्यानंतर पर्यटकांच्या भेटीला
औरंगाबाद, दि.6(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या सिध्दार्थ उद्यान येथे सहा महिन्यापूर्वी जन्मलेले 2 पांढऱ्या वाघांच्या बछड्यांना आज मुक्त संचार करण्याकरिता बाहेर मोकळ्या पिंजऱ्यात सोडण्यात आले.
वाघांचे शहर म्हणून ओळख असलेल्या महानगरपालिकेच्या सिध्दार्थ उद्यान प्राणी संग्रहालय येथील पांढऱ्या वाघांचे दोन बछडे कान्हा व विक्रम यांना आयुक्त तथा प्रशासक जी.श्रीकांत यांच्या हस्ते पिंजऱ्याचे दार उघडून त्यांना मोकळ्या वातावरणात बाहेरील मोठ्या मोकळ्या पिंजऱ्यात मुक्त संचार करीता सोडण्यात आले.
दि.7 स्पटेंबर 2023 रोजी अर्पिता व वीर या पांढऱ्या वाघांच्या जोडीच्या दोन बछड्यांचा जन्म झाला होता. कान्हा व विक्रम असे नामकरण करून त्यांना नवीन ओळख देण्यात आली.
आज सहा महिन्यानंतर पर्यटकांच्या भेटीला हे दोन पांढरे वाघांचे बछडे मोकळ्या पिंजऱ्यात सोडण्यात आले आहेत त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांचे सर्व कृती सामान्य असल्याचे वाघांचे काळजी वाहक मोहम्मद जीया यांनी सांगितले.
यावेळी आयुक्त यांच्या समवेत मुख्य उद्यान अधीक्षक विजय पाटील, प्र.पशू वैद्यकीय अधिकारी शेख शाहेद, पशुधन पर्यवेक्षक संजय नंदन, वाघांचे काळजीवाहक मोहम्मद जिया यांची उपस्थिती होती.
लवकरच सिद्धार्थ उद्यान येथे पर्यटकांच्या सोयीसाठी ई टिकिटिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे यावेळी आयुक्त महोदयांनी प्रसार माध्यमांशी बोलताना
सांगितले.
What's Your Reaction?